sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
सोमवार, 19 जून 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध करावी : आठवले
एनडीएने राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणुन भाजपचे दलित नेते आणि बिहारचे विद्यमान राज्यपाल रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर केली आहे. हा क्रांतीकारी निर्णय आहे. दलित व्यक्ती राष्ट्रपती होत असल्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी उमेदवार देऊ नये. ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
पूर्ण बातमी इथे वाचा

नेत्यांच्या मराठवाडा दौऱ्याने राष्ट्रवादीला बळ मिळणार?
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील फडणवीस सरकारच्या विरोधात मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदीतील घोळ आणि नुकताच हातात घेतलेला समृध्दी महामार्गाचा मुद्दा ही सगळी शस्त्रे निरुपायोगी ठरली. उलट माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीच्या कथित चौकशीचे पिल्लू सोडून सरकारने राष्ट्रवादीच्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला.
पूर्ण बातमी इथे वाचा

राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेची सावध भूमिका
राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या भूमिकेकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, आज एनडीएच्या उमेदवाराची घोषणा होताच शिवसेनेने सावध भूमिका घेत दोन दिवसात पुढची भूमिका जाहिर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

विश्वास नांगरे पाटील यांची  पालखीमार्गावर सायकल वारी 
पालखीमार्गावरील सुरक्षितता जवळून पाहता यावी यासाठी पंढरपूरपर्यंत पालखीमार्गावर सायकलद्वारे निघाल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
पूर्ण बातमी इथे वाचा

पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय आहे? 
 संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा रविवारी (18 जून) पुण्यात दाखल झाल्यानंतर वेगळाच वाद निर्माण झाला. सांगलीच्या संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठानचे दोन हजार कार्यकर्ते हातात मशाल आणि तलवारी घेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यापुढे चालत होते, अशी तक्रार पोलिसांकडे चोपदारांनी केली.
पूर्ण बातमी इथे वाचा
 

सरकारनामा ट्विटर

 

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स