sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
सोमवार, 26 जून 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

कुणाचे थडगे बांधून समृध्दी नको - उध्दव ठाकरे
समृध्दी महामार्गात संपुर्ण अडीच एकर सुपीक जमीन जाणाऱ्या उत्तम पल्लाळ या शेतकऱ्याला रडू कोसळले. उध्दव ठाकरे यांनी त्याला धीर देत बोलते केले, तेव्हा दोन वर्षापुर्वी बागायती असलेली आमची जमीन महसुल विभागाने जिरायती दाखवल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले. तसेच धनदांडग्यांची इंग्रजी शाळा वाचवण्यासाठी हा रस्ता वळवून आमच्या शेतातून घातल्याचे सांगितले. 
पूर्ण बातमी इथे वाचा

अजितदादांना पाच महिन्यानंतर सापडली पिंपरी-चिंचवडची वाट 
राष्ट्रवादी काॅंग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असताना अजित पवार हे दर पाच दिवसांनी या शहरात यायचे. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी या शहराचे नावच टाकले. त्यांनी पालिका निवडणूक प्रचारात भाग घेतला. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर ते आता पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जुलै रोजी येणार आहेत.
पूर्ण बातमी इथे वाचा

सदाभाऊंच्या सत्काराचा " फ्लॉप शो'
नगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता आहे. मंत्री सदाभाऊ या आघाडीचे प्रमुख नेते आहेत. शिवसेना या आघाडीचा घटकपक्ष असून त्यांचे पाच नगरसेवक आहेत. असे असताना आरपीआयच्या कोमल बनसोडे आणि नगराध्यक्ष व पक्षप्रतोद वगळता कुणीही नगरसेवक या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. 
पूर्ण बातमी इथे वाचा

सहकारमंत्र्यांचा हात फ्रॅक्‍चर 
राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख रविवारी (ता. 25) येथे एका कार्यक्रमात व्यासपीठावरून खाली उतरत असताना पाय घसरून पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्‍चर झाले. येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते सोलापूरला रवाना झाले.
पूर्ण बातमी इथे वाचा

भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ठाकरेंचा आसूड
भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा कोणत्याही पक्षांनी कर्जमाफीचे श्रेय घेऊ नये. कारण ते श्रेय संपकरी शेतकऱ्यांचेच आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वच पक्षांवर आसूड ओढला.
पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारनामा ट्विटर
 

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स