sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
सोमवार, 3 जुलै 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

कर्जमाफीतून धनदांडग्यांना वगळले हे चांगलेच झाले - सुरेश पाटील 
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देतांना सरकारने धनदांडग्यांना वगळण्याचा जो निणर्य घेतला तो अत्यंत योग्य आणि व्यवहार्यच आहे. नियमित कर्जफेडणाऱ्यांना 25 हजारांचे अनुदान हा देखील या कर्जमाफीतील महत्वाचा भाग म्हणावा लागेल. या दोन मुलभूत निर्णयांमुळेच कॉंग्रेस-आघाडी सरकारने दिलेल्या कर्जमीफी पेक्षा आजची कर्जमाफी वेगळी ठरते असे स्पष्ट मत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेश पाटील यांनी सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. 
पूर्ण बातमी इथे वाचा

शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग आता ठरणार गुन्हा : अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा
 शेतकरी आत्महत्या या शब्दाचा समाज मनावर होणारा विपरीत परिणाम थांबविण्यासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी यापुढे बैठकांमध्ये शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग टाळण्याचा फतवाच जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

सदाभाऊ हाजिर व्हा ! स्वाभिमानीची नोटीस
पक्ष संघटनेच्या विरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना बाजू मांडण्यासाठी हजर होण्याची नोटीस पाठवली आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

पंढरपूर विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर  समिती अध्यक्षपदी अतुल भोसले 
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे भाजप नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य सरकारने सोमवारी केली भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, श्री गहनीनाथ औसेकर महाराज,.एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड यांची नावे चर्चेत होती. 
पूर्ण बातमी इथे वाचा

सांगली: भाजपला मते देवून जिल्ह्याचा विकास खुंटला  - अजित पवार
 केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. गेल्या तीन वर्षात भाजपला ताकद देण्याचे काम मतदारांनी केले. मात्र त्याबदल्यात जिल्ह्याला काय मिळाले? युतीचे पाच आमदार असतानाही जिल्ह्याचा विकास खुंटला.
पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारनामा ट्विटर

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स