SARTHI: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाचं परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगणार? 'सारथी'च्या शिष्यवृत्तीमध्ये दिरंगाई

आठ महिन्यानंतरही मंत्रालयातील प्रस्ताव धूळखात
SARTHI: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाचं परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगणार? 'सारथी'च्या शिष्यवृत्तीमध्ये दिरंगाई
Updated on

मुंबई: मराठा आरक्षणाचा बोजवारा उडालेला असताना गरजू आणि पात्र मराठा विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्नदेखील यंदा भंगणार असल्याची भीती आहे.

परदेशात उच्च पदव्युत्तर आणि पीएचडीसाठीचे शिक्षण घेण्यासाठी ‘सारथी’ संस्थेमार्फत ५० पात्र विद्यार्थ्यांना दर वर्षी ३० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, २०२३-२०२४ या वर्षातील परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रस्ताव नोव्हेंबर २०२२ पासून मंत्रालयात धुळखात पडला आहे.

SARTHI: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाचं परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगणार? 'सारथी'च्या शिष्यवृत्तीमध्ये दिरंगाई
Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! परभणीतून पंढरपूरला जाण्यासाठी १३३ बसगाड्या सोडण्याचा निर्णय

राज्य शासनाच्या व ‘सारथी’च्या निष्काळजीपणामुळे परदेशात शिक्षणास जाणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षाची संधी जाण्याची भिती यामुळे निर्माण झाली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने अर्थिकदृबल घटकातील मराठा विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० वरून ५० केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधानसभेत घोषणाही केली. या शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीची जबाबदारी ‘सारथी’कडे दिली. परंतु, या चालु शैक्षणिक वर्षासाठीची साधी जाहिरात देखील सरकारने अथवा ‘सारथी’ने काढलेली नाही.

दरम्यान, इतर मागास घटकातील अर्थात ओबीसी व एससी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची जाहिरात महिनाभरापूर्वीच निघालेली आहे. या घटकातील अर्ज प्रक्रियाही सुरु झाली आहे.

SARTHI: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाचं परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगणार? 'सारथी'च्या शिष्यवृत्तीमध्ये दिरंगाई
Ashadhi Wari : वारीत यंदा महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी, विसावा कक्षाची सुविधा

प्रस्तावाला दाद नाही

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगणार

‘ओबीसी’, ‘एससी’, ‘एसटी’ ची कार्यवाही सुरू

‘सारथी’ प्रशासनाच्या प्रस्तावाला दाद नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis Stresses Holistic Maratha Empowerment
Pawar Rejects Accusations
Kolhapur Engineer End Life in kagal midc
Pandharpur Wari Reaches the World Stage with Landmark London Launch
Marathi News Esakal
www.esakal.com