संभाजी महाराजांनंतर आता तुकाराम महाराजांच्या पत्नीची बदनामी

Sarva Shiksha Abhiyan Book On Sant tukaram Says sant Tukarams wife abusive
Sarva Shiksha Abhiyan Book On Sant tukaram Says sant Tukarams wife abusive

मुंबई- संभाजी महाराज हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता असा वादग्रस्त उल्लेख राज्य सरकारच्या 'सर्व शिक्षा अभियानाच्या' समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात सापडल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. या पुस्तकात छापलेल्या या मजकूराविषयी संभाजी ब्रिगेडने आक्षेपही घेतला होता. यानंतर आता राज्य सरकारच्या पुस्तकातून संत तुकाराम महाराजांच्या पत्नीची बदनामी करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.


सर्व शिक्षा अभियानात 'संतांचे जीवन प्रसंग' या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक गोपीनाथ तळवलकर यांनी लिहिले आहे. तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची, तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या. असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच संत तुकाराम महाराजांचा उल्लेख त्या 'ते आमचं येडं' असा करायच्या असे सांगण्यात आले आहे. 
 

संभाजी महाराजांची पुस्तकातून बदनामी केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडने जोरदार निषेध नोंदवला होता. यातच आता संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीविषयी पुस्तकात वादग्रस्त मजकूर असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याला अनुसरुन संभाजी ब्रिगेडने राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com