Video : भाजप खासदार उदयनराजे उवाच; केंद्र व राज्य सरकारला दिला 'हा' सल्ला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

अर्थव्यवस्था ढासळली आहे. चाेरी, मारामारी असे प्रकार वाढतील. केंद्र आणि राज्य शासनाने लाॅकडावून उठविले पाहिजे. प्रॅक्टीकल झाले पाहिजे असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

सातारा : लाेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. किती दिवस तुम्ही लाेकांना घरात बसवून ठेवणार असा सवाल खासदार उदयनराजे भाेसले यांनी केला आहे. लाॅकडावून उठवा अन्यथा लाेक कायदा हातात घेतील असेही उदयनराजेंनी केंद्र आणि राज्य सरकारला सल्ला दिला आहे. याबाबत पंतप्रधानांनाही ई-मेलव्दारे कळविल्याचे उदयनराजेंनी नमूद केले.
साताऱ्यात उद्यापासून या गाेष्टींसाठी बंदी; काळजी घ्या,सतर्क रहा 
 

खासदार भोसले यांनी आज (गुरुवार) सातारा पालिकेशी संबंधित काही प्रश्‍न, औद्योगिक वसाहत, रेल्वे आणि कोरोनाच्या प्रश्‍नासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी त्यांच्यासमवेत सुनील काटकर, ऍड. दत्तात्रय बनकर, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उदयनराजेंना माध्यमांनी गाठले. त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. 

सातारा जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासन सर्व काही आटोक्‍यात आणू शकणार नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोना रोखण्यासाठी देशातील संशोधक व शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार करायला हवेत. त्यासाठी मी पंतप्रधानांनाही ई-मेलव्दारे कळविले आहे. दूसरी गाेष्ट म्हणजे आता लाॅकडावून उठविणे गरजेचा आहे. किती दिवस लाेकांना तुम्ही घरात बसवून ठेवणार. लाेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे. तर तुम्ही कुटुंबाची काळजी घेऊ शकणार. आता लाॅकडावून उठविले नाही तर लाेक गप्प बसणार नाही. त्यांच्या घरात अन्नधान्य नसेल तर त्यांनी जगायचे कसे. जगात विस्कळीतपणा आला आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. चाेरी, मारामारी असे प्रकार वाढतील. केंद्र आणि राज्य शासनाने लाॅकडावून उठविले पाहिजे. प्रॅक्टीकल झाले पाहिजे असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

राज्यातील नाट्यगृहे, ग्रंथालये खूली करा : उदयनराजे  

Video : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चाखले 'माेदीं"चे पेढे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara MP Udayanraje Bhosale Demands To UnLock India