esakal | "अमूल'ला मदत करण्यासाठी 'गोकुळ'ला मोठे होऊ दिले नाही; सतेज पाटलांचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

'अमूल' ला मदत करण्यासाठी 'गोकुळ' ला मोठे होऊ दिले नाही

दुधाला दोन रुपये जास्त दर देण्याचे भविष्यातील नियोजन; सतेज पाटील

'अमूल' ला मदत करण्यासाठी 'गोकुळ' ला मोठे होऊ दिले नाही

sakal_logo
By
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्रात दुग्धजन्य पदार्थांसाठी मुंबई (Mumbai) हेच प्रमुख मार्केट आहे. मुंबईमध्ये गोकुळचे (Gokul Dudh Sangh Kolhapur) बस्तान बसवणे ही आपली जबाबदारी आहे. पण मागच्या दाराने त्यांना "अमूल'ला (Amul) मदत करायची असेल म्हणून त्यांनी गोकुळ वाढू दिला नाही, असा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांच्यावर केला. आत्तापर्यंत ही जागा मिळाली पाहिजे होती. पण, ती मिळाली नाही, पण आम्ही ही जागा घेण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

गोकुळ संचालिका शौमिक महाडिक यांनी काल गोकुळला चार महिन्यात 55 कोटींचा तोटा झाला असून मुंबई, वाशी,भोकरपाडा येथील जमिन खरेदीमुळे संघाला मोठा फटका बसणार असल्याची टिका केली होती. आज गोकुळच्या वार्षिक सभेनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांना याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे कल्याण कसे होईल. त्यांच्या दुधाला दोन रुपये जास्त दर कसा देता येईल, हे भविष्यातील आमचे नियोजन आहे. यासाठी वाशी, नवी मुंबई , भोकरपाडा येथील जमिन गोकुळसाठी खूप महत्वाची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही प्रॉपर्टी होणार असल्याचे गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील आणि कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी सांगितले आहे यात काहीही चुकीचे नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास आम्हाला आवडेल. सभासंदांच्यामध्ये वार्षिक सभा घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. पण, कोरोनामुळे मोठ्या सहकारी संस्थांना ऑनलाईन वार्षिक सभा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ही सभा ऑनलाईन घेतली. पुढच्यावर्षीची सभा ही ऑफलाईन घेतली जाईल. सत्ताधाऱ्यांनी निवडणूकीमध्ये दोन रुपये जादा दर देण्याच्या क्रांतीकारी निर्णय संचालकांनी घेतला आहे. त्यामुळे लोकांसमोर जाण्यास निश्‍चितपणे आनंद वाटणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मुंबई-पूणे हायवेला लागूनच एमआरडीसीची 16 एकर जमिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोकुळला देण्याची भूमिका घेतली आहे. गोकुळसाठी हे मोठे पाऊल असणार आहे. भविष्यात 20 लाख लिटर संकलन झाल्यानंतर याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.राजकारण करुन वासाचे दूध काढले जात होते. असे दूध काढले जावू नये यासाठी आम्ही उठाव केला होता. आता राजकारण करुन वासाचे दूध काढले जाणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे पाटील यांनी सांगितेल.

loading image
go to top