exam
examesakal

मोठी बातमी! शनिवारी, रविवारी पण विद्यार्थ्यांचे तास; मेमध्ये विद्यापीठांची अंतिम सत्र परीक्षा

राजभवनातील आदेशानुसार, विद्यार्थ्यांचे शनिवार, रविवारी देखील ऑनलाइन, ऑफलाईन तास घेतले जाणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करून जूनमध्ये विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा उकरली जाणार आहे.

सोलापूर : राज्यातील अकृषिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या दोन सत्र परीक्षेत किमान ९० दिवसांचे अध्यापन जरुरी आहे. पण, कोरोनामुळे शैक्षणिक सत्रात विस्कळितपणा आला आहे. आता अंतिम सत्र परीक्षेसाठी तेवढा वेळ थांबणे अशक्य असल्याने राजभवनातील आदेशानुसार, विद्यार्थ्यांचे शनिवार, रविवारी देखील ऑनलाइन, ऑफलाईन तास घेतले जाणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करून मे-जूनमध्ये विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा उकरली जाणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, पुणे, मुंबईसह इतर अकृषिक विद्यापीठात आगामी अंतिम सत्र परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. पुणे विद्यापीठाची पुढील सत्र परीक्षा साधारणतः २० मेपासून सुरु होणार आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा मेअखेरीस घेऊन जूनपर्यंत निकाल जाहीर करून जुलैमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता विद्यापीठांकडून घेतली जात आहे. राज्यात १३ अकृषिक विद्यापीठे असून त्याअंतर्गत अंतिम वर्षासाठी जवळपास नऊ लाखांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित आहेत. बहुतेक विद्यापीठांची सत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत संपली आहे. आता एप्रिलमध्ये त्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना मे-जूनमध्ये परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. कोरोनामुळे विस्कळित झालेले वेळापत्रक पूर्वपदावर आणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांचे अध्यापन सुरुच ठेवले जाणार आहे.

मेअखेरीस सर्वच विद्यापीठांची परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा २० मेपासून तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा २५ मेदरम्यान सुरु होणार आहे. तर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव विद्यापीठाची परीक्षा २९ मेपासून सुरु होणार आहे. राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांची अंतिम सत्र परीक्षा मेअखेरीस होणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे दररोज दोन पेपर घेण्याचेही नियोजन आहे.

‘ऑनस्क्रिन मूल्यमापना’मुळे महिन्यात निकाल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह राज्यातील १३ अकृषिक विद्यापीठांनी उत्तरपत्रिकांच्या पडताळणीसाठी आता ऑनस्क्रिन मूल्यमापन पद्धती सुरु केली आहे. त्यामुळे परीक्षेनंतर ३० दिवसांत निकाल शक्य झाला आहे. मेअखेरीस परीक्षा पार पडल्यानंतर जूनअखेरीस परीक्षा संपेल आणि जुलैमध्ये निकाल जाहीर होऊन प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर आगामी शैक्षणिक सत्र १५ ऑगस्टपूर्वी सुरु होणार आहे.

विद्यापीठांच्या परीक्षांचे नियोजन

  • अकृषिक विद्यापीठे

  • १३

  • ‘अंतिम’चे अंदाजे विद्यार्थी

  • ९ लाख

  • सत्रातील दररोज पेपर

  • परीक्षेला सुरवात

  • २० ते २५ मेपासून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com