Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा

Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा
Updated on

पुणेः शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आयुक्तालयाने पुढाकार घेऊन विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. कृतीदलाचे अध्यक्ष रफीक नाईकवाडी (संचालक, विस्तार व प्रशिक्षण) व सदस्य सुनील बोरकर (संचालक,आत्मा) यांच्यासोबत शेतकरी कृती समितीच्यावतीने एसबी पाटील यांनी चर्चा केली. त्यात राज्यातील बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या मास्टर सर्क्युलरनुसार आजपर्यंत कधीही नैसर्गिक आपत्तीच्या काळात नियम न पाळल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या आहेत. शेतकऱ्यांचा सिबीलदेखील बँकांनी खराब केला. बँकांनी नियमांचे पालन करावे यासाठी उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम आदेश दिले आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी झाली तरी शासनावरील खूप मोठा भार कमी होईल व आत्महत्या कमी होतील, असे मुद्दे एसबी पाटील यांनी मांडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com