मुंबई - शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यामध्ये पुन्हा बदल करुन ती पूर्ववत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. तसेच यावर्षी पासूनच हा निर्णय अंमलात आणण्याबाबत शालेय विभागाने प्रयत्न करावा असे निर्देश भुसे यांनी दिले.