सोलापूर जिल्ह्यातील 1262 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती! इयत्ता पाचवीचा निकाल 22.88 तर आठवीचा निकाल 16.03 टक्के; दोन्ही वर्गातील 29,611 विद्यार्थी अपात्र

जिल्ह्यातील पाचवीच्या पाच हजार १०१ पात्र विद्यार्थ्यांपैकी ६४५ तर आठवीच्या दोन हजार ३६९ पात्र विद्यार्थ्यांपैकी ६१७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पाचवी व आठवीतील एकूण २९ हजार ६११ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरले आहेत.
school
Students Scholarshipsakal

सोलापूर : पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पाचवीचा निकाल २२.८८ टक्के तर आठवीचा निकाल १६.०३ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातील पाचवीच्या पाच हजार १०१ पात्र विद्यार्थ्यांपैकी ६४५ तर आठवीच्या दोन हजार ३६९ पात्र विद्यार्थ्यांपैकी ६१७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पाचवी व आठवीतील एकूण २९ हजार ६११ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरले आहेत.

शिष्यवृत्तीसाठी १८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचवीच्या २२ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४७८ विद्यार्थी गैरहजर राहिले. उर्वरित २२ हजार २९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी पाच हजार १०१ विद्यार्थी पात्र ठरले असून, १७ हजार १९५ अपात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांपैकी ६४५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. आठवीच्या १५ हजार १५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. १४ हजार ७८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी दोन हजार ३६९ विद्यार्थी पात्र ठरले असून १२ हजार ४१६ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांपैकी ६१७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

सोलापूर शहराचा २२.३८ अन् १९.६२ टक्के निकाल

सोलापूर महापालिका क्षेत्राचा शिष्यवृत्ती परीक्षेचा पाचवीचा निकाल २२.३८ तर आठवीचा १९.६२ टक्के निकाल लागला आहे. परीक्षेसाठी पाचवीच्या तीन हजार १२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले तर एक हजार ८३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६७६ विद्यार्थी पात्र तर दोन हजार ३४४ विद्यार्थी अपात्र ठरले. पात्र विद्यार्थ्यांपैकी ४३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. आठवीच्या दोन हजार ६०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले तर दोन हजार ४८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४८८ पात्र तर दोन हजार विद्यार्थी अपात्र ठरले. पात्र विद्यार्थ्यांपैकी ४३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.

तालुकानिहाय पात्र, शिष्यवृत्तीधारक व टक्केवारी

(पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा)

 • तालुका पात्र शिष्यवृत्तीधारक टक्केवारी

 • अक्कलकोट २५३ ६९ १७.४४

 • बार्शी ७३५ ९२ ३१.२०

 • करमाळा २८९ ३७ २३.१४

 • माढा ५०५ ७५ २७.९९

 • माळशिरस ४९९ ५६ १८.१७

 • मंगळवेढा २८२ ४२ २६.२१

 • मोहोळ ३४३ ४० २१.५३

 • उत्तर सोलापूर २६९ ५१ १९.७२

 • पंढरपूर ४५८ ३२ १९.५८

 • सांगोला ४८५ ८९ २६.४३

 • सोलापूर मनपा ६७६ ४३ २२.३८

 • दक्षिण सोलापूर ३०७ १९ २०.९८

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

 • तालुका पात्र शिष्यवृत्तीधारक टक्केवारी

 • अक्कलकोट ७० १९ ६.२७

 • बार्शी ३८६ १३७ २४.०१

 • करमाळा ७९ २८ १२.२७

 • माढा १९० ५६ १६.१६

 • माळशिरस १५१ ३५ ९.१६

 • मंगळवेढा १४१ ४८ २०.४७

 • मोहोळ ९७ ३८ १०.४०

 • उत्तर सोलापूर २३० ४४ २४.७४

 • पंढरपूर २६७ ६६ १५.५५

 • सांगोला १९५ ९० २२.३९

 • सोलापूर शहर ४८८ ४३ १९.६२

 • दक्षिण सोलापूर ७५ १३ ७.८०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com