नक्‍की वाचा : केंद्र सरकारच्या पत्रामुळे "या' दिवशी वाजणार शाळेची पहिली घंटा 

तात्या लांडगे
रविवार, 31 मे 2020

शाळा भरविण्यासाठी महत्वाचे राहणार 
पालकांसह समाजातील प्रतिष्ठातांचे अभिप्राय 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच विषाणूच्या संक्रमणास पोषक वातावरण असल्याने शाळा-महाविद्यालये सुरु करुन वर्ग भरविण्याबाबत पालकांसह समाजातील प्रतिष्ठीत व्यक्‍तींचे अभिप्राय घ्यावेत, असे केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना सांगितले आहे. पाचवा लॉकडाउन संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. त्या अभिप्रायाचा विचार करुन जुलैनंतर शाळा भरविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर केंद्राच्या निर्णयानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार, याचीही उत्सुकता आहे. 

सोलापूर : रेड झोनमधील शहरे व जिल्ह्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे. अनेक शाळांच्या इमारतींचा वापर कोरोना संशयितांना क्‍वारंटाईनसाठी होत आहे. दुसरीकडे दहावी-बारावीचा निकालही लागलेला नाही. निकालानंतर प्रवेशासाठी किमान 30-35 दिवस द्यावे लागणार असून त्यातच आता पावसाळा सुरु होईल. या सर्व पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांचा मुहूर्त लांबला असून शाळांची पहिली घंटा स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर वाजविण्याचे नियोजन केले जात आहे. 

केंद्र सरकारने पाचवा लॉकडाउन जाहीर करताना शालेय विद्यार्थ्यांची आवर्जून दखल घेतली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढीचा काळ संपला नसून पावसाळ्यात त्यात वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते जुलैपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव राहणार असून त्यानंतर कमी होईल. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जुलैपर्यंत शाळांचे कुलूप उघडू नका, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, 15 जूनपासून शाळा सुरु होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. मात्र, राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या 16 डीडी चॅनलपैकी काही चॅनलची मागणी करीत दररोज 12 तासांचा वेळीही मागितला. मात्र, केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली नसून शिक्षकांनाही ऑनलाइन शिक्षणाचे प्रशिक्षण देणे बाकी आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणचाही मुहूर्त लांबणीवर पडणार आहे. तुर्तास पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर संपर्क साधून वर्गशिक्षक स्वयंअध्ययनाचा सल्ला देत आहेत. 
 
केंद्राकडून डीडी नॅशनलचे चॅनल व वेळही मिळाली नाही

केंद्राकडून चॅनल अन्‌ वेळ मिळाल्यानंतर सुरू होईल ऑनलाइन टिचिंग 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सुमारे अडीच कोटी विद्यार्थ्यांना दूरदर्शन व आकाशवाणीच्या माध्यमातून 15 जूनपासून ऑनलाइन शिक्षण देण्याची तयारी आयटी विभागाने केली होती. मात्र, लॉकडाउन 30 जूनपर्यंत वाढला असून केंद्र सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय जुलैपर्यंत घेऊ नये, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्राकडून डीडी नॅशनलचे चॅनल व वेळही मिळाली नाही. 
- विकास गरड, उपसंचालक, आयटी सेल 

शाळा भरविण्यासाठी महत्वाचे राहणार 
पालकांसह समाजातील प्रतिष्ठातांचे अभिप्राय 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच विषाणूच्या संक्रमणास पोषक वातावरण असल्याने शाळा-महाविद्यालये सुरु करुन वर्ग भरविण्याबाबत पालकांसह समाजातील प्रतिष्ठीत व्यक्‍तींचे अभिप्राय घ्यावेत, असे केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना सांगितले आहे. पाचवा लॉकडाउन संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. त्या अभिप्रायाचा विचार करुन जुलैनंतर शाळा भरविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर केंद्राच्या निर्णयानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार, याचीही उत्सुकता आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school first bell will ring on this day due to the Central Governments letter