‘स्वच्छ’ उपक्रमात राज्यातील ६० टक्के शाळा

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत पुरस्कार योजना; नोंदणीत अंदमान प्रथम, तामिळनाडूचे स्थान तळात
schools state involved Clean activitie
schools state involved Clean activitiesakal

मांजरखेड : संपूर्ण देशात २०१४ मध्ये गांधी जयंतीपासून सुरू झालेल्या स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. शाळांना यामध्ये सहभागी होण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख होती. अंदमान व निकोबार बेटांवरील १०० टक्के शाळांनी नोंदणी करून देशात ‘टॉपर’चे स्थान पटकावले. महाराष्ट्र १६व्या क्रमांकावर आहे.

तमिळनाडूत जेमतेम १.५५ टक्के शाळांनी नोंदणी केली. हे राज्य देशात सर्वांत मागे आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार पोर्टलवर शाळांची नावनोंदणी करण्यात अंदमान, गोवा, पुदुच्चेरी, गुजरात, आंध्र प्रदेश अग्रस्थानी आहे. महाराष्ट्र या यादीत १६व्या क्रमांकावर असून राज्यातील एक लाख १० हजार १०९ पैकी ६४ हजार शाळांनी नोंदणी केली आहे. ५९ निर्देशांकाची माहिती शाळांनी स्वतः केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपवर भरण्याची सुविधा असते.

राज्यात उशिरा जाग

महाराष्ट्रातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक शाळांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. यामध्ये जळगाव, नगर, सांगली, सातारा व अकोला हे जिल्हे पुढे आहेत.

राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेवटच्या दिवसांत हा विषय गांभीर्याने घेतल्याने अनेक जिल्हे अखेरच्या दोन-तीन दिवसांत सक्रिय झाले होते. नोंदणी केली नाही तर मुख्याध्यापकांवर कारणे दाखवा बजावण्यात येईल, अशी तंबी दिल्यानंतर अनेक शाळा ३१ मार्चला शेवटच्या तासांत सक्रिय झाल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले होते.

स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी

जिल्हास्तरावर ३८ शाळा, राज्यस्तरावर २६ तर राष्ट्रीय स्तरावर ४६, शाळांची निवड

  • ३१ मार्च : शाळांना नावनोंदणीसाठी मुदत

  • १ ते १५ एप्रिल : शाळा पडताळणी व निवड

  • १ एप्रिल ते २२ मे : राज्यस्तरीय शाळा निवड

  • ७ जुलैपर्यंत : राज्यस्तरीय पडताळणी

  • २२ मे ते ३० जून : राज्यस्तरीय शाळांची निवड

  • १ ते ७ जुलै : राज्यस्तरीय पडताळणी

  • ७ जुलै ते ७ सप्टेंबर ; राष्ट्रीय पडताळणी

  • १५ ऑक्टोबर : स्वच्छ विद्यालय योजनेचे पुरस्कार दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com