School Food: विद्यार्थ्यांची पौष्टिक बिस्किटेही पोषण आहारातून गायब

राज्यातील सरकारी शाळांतील ४० लाख विद्यार्थी सहा महिन्यांपासून प्रतिक्षेत
शालेय पोषण आहार योजना
शालेय पोषण आहार योजना Sakal

पुणे : राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत पौष्टिक बिस्किटांचे (न्युट्रिटीव्ह स्लाईस) वाटप करण्याबाबतची राज्य सरकारची घोषणा हवेतच विरली असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सहा महिन्यापूर्वीच अधिकृत परिपत्रक काढूनही अद्याप एकाही विद्यार्थ्यांना ही बिस्किटे मिळू शकली नसल्याचे राज्यभरातील शिक्षकांचे म्हणणे आहे. मुळात मागील सहा महिन्यांपासून शालेय पोषण आहार योजनाच बंद आहे. मग ही पौष्टिक बिस्किटे कशी मिळणार, असा सवालही या शिक्षकांनी उपस्थित केला आहे. परिणामी सरकारी शाळांमधील चाळीस लाखांहून अधिक विद्यार्थी हे मागील सहा महिन्यांपासून या पौष्टिक बिस्किटांच्या प्रतिक्षेत आहेत. (School Healthy Food)

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबतच ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, सोयाबीन या प्रमुख घटकांसह गव्हाचे पीठ, प्रक्रिया केलेले लोहयुक्त गहू पीठ, साखर पावडर, खाद्यतेल, दूध पावडर आणि चवीसाठी उपयुक्त असणारे घटक, जसे हळद, मीठ,तिखट आदी विविध पदार्थांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले हे न्युट्रिटीव्ह स्लाईस वितरित करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

शालेय पोषण आहार योजना
पुणे : लसीकरण केंद्रावरील कर्मचारी पगारच्या प्रतिक्षेत

या आदेशानुसार या सर्व घटकांचा समावेश असलेले प्रत्येकी १२० ग्रॅमचे रोज एक बिस्कीट महिन्यातून किमान २४ दिवस वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबतचे परिपत्रक तत्कालीन शिक्षण संचालक (प्राथमिक) दत्तात्रेय जगताप यांनी ८ सप्टेंबर २०२१ ला सर्व जिल्हा परिषदांना पाठविले आहे.

ही पौष्टिक बिस्किटे राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे आणि अन्य सर्व सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबतच वितरित करण्याची सूचना याबाबतच्या परिपत्रकाद्वारे करण्यात आली होती. शाळास्तरावर या बिस्किटांचा पुरवठा करण्यासाठी प्राथमिक शिक्षक संचालनालयाने निविदांच्या माध्यमातून मराठवाड्यातील एका कंपनीकडे हे काम सोपविले आहे.

राज्यातील पात्र शाळा व विद्यार्थ्यांची संख्या

  • पहिली पाचवीपर्यंतच्या पात्र शाळांची संख्या --- ४९, ९३१

  • पाचवीपर्यंतचे विद्यार्थी--- ३०, ९२, ९९२

  • सहावी ते आठवीपर्यंतच्या एकूण शाळा --- १७,१५१

  • सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थी --- ९,६१, २४७

  • पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण शाळा --- ६७, ०८२

  • पहिली ते आठवीपर्यंतचे एकूण विद्यार्थी --- ४०, ५३, ५३९

राज्यातील सरकारी शाळांमधील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत न्युट्रिटीव्ह स्लाईसचे (पौष्टिक बिस्किटे) वितरण नियमितपणे सुरु झाले आहे. केवळ एका जिल्ह्याचा याला अपवाद असून अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरळीत सुरु आहे.

- दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (प्राथमिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com