
सोलापूर : शालेय शिक्षण विभागाच्या १३ फेब्रुवारी २०१३ चा निर्णयानुसार आदेशानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले. काहींना मार्च २०१९ पर्यंत तीन किंवा पाच संधी देण्यात आल्या. मात्र, मुदत देऊनही अनेकजण टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे.
शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवार टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होण्याचे बंधन २०१३ पासून लागू करण्यात आले आहे. अनेकांनी नियुक्तीनंतर टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन ते पाच वर्षांची मुदत घेतली. त्यानुसार २०१९ पर्यंत ही मुदत असतानाही अनेकांना त्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होता आलेले नाही. मुदतवाढ घेऊनही टीईटी उत्तीर्ण न होता शासनाची पगार घेणाऱ्या शिक्षकांचा शोध घेतला जात आहे. असे जे शिक्षक आढळतील त्यांची सेवासमाप्ती केली जाणार आहे. तत्पूर्वी, अशा शिक्षकांची नावे शिक्षण उपसंचालकांना पाठविली जाणार आहे. त्याठिकाणी सुनावणी होईल आणि सुनावणीअंती उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या शिक्षकांवर सेवासमाप्तीची कारवाई करतील.
सोलापूर जिल्ह्यात एक हजार ८५ खासगी अनुदानित माध्यमिक शाळा असून त्याअंतर्गत सुमारे १५ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील काहीजण टीईटी उत्तीर्ण नसल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर खासगी अनुदानित शाळांकडून त्यांच्याकडील कार्यरत शिक्षकांची माहिती मागविण्यात आली असून शालार्थ आयडीवरूनही त्याची माहिती मिळू शकते. त्यामुळे सर्व संस्थांना वस्तुनिष्ठ माहिती सादर करावी लागणार आहे.
शाळेने वस्तुनिष्ठ माहिती द्यावी
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील १०८५ शाळांमधील १५ हजार शिक्षकांपैकी कोण टीईटी उत्तीर्ण नाहीत, याची माहिती मागविण्यात आली आहे. कोणत्याही शाळेने माहिती न लपविता वस्तुनिष्ठ माहिती देणे आवश्यक आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
‘टीईटी’ उत्तीर्णसाठी मुदतवाढ बंद
शासनाच्या २०२० मधील निर्णयानुसार अनुकंपा वगळता अन्य प्रवर्गातील शिक्षकांना (जे टीईटी उत्तीर्ण नाहीत असे) टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देणे बंद करण्यात आले आहे. अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांनाच तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसतानाही शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.