झेडपीच्या शाळांत पाचवीचे वर्ग; "माध्यमिक'मध्ये भरणार सहावीपासूनचे वर्ग 

गजेंद्र बडे : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 17 September 2020

नव्या पॅटर्ननुसार पूर्वी चौथीपर्यंत वर्ग असलेल्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये आपोआप पाचवीचा तर, सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांमध्ये आठवीचा वर्ग सुरू होणे अपेक्षित होते.

पुणे - राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये यापुढे इयत्ता सहावीपासूनचे वर्ग राहणार आहेत. त्यामुळे माध्यमिक शाळांमधील पाचवीचे सर्व वर्ग आता प्राथमिक शाळांमध्ये भरविला जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये आता सरसकट पाचवीचा वर्ग सुरू होणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

"जिल्हा परिषद शाळांमधील पाचवी, आठवीचे वर्ग अडकले नियमांच्या कचाट्यात', या शीर्षकाखाली "सकाळ'ने 24 जुलै 2020 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेनेही याबाबत सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. शिवाय जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे आणि शिरूरचे आमदार अशोक पवार यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत पत्र दिले होते. 
नव्या पॅटर्ननुसार पूर्वी चौथीपर्यंत वर्ग असलेल्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये आपोआप पाचवीचा तर, सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांमध्ये आठवीचा वर्ग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र सहा वर्षांपासून सुमारे 600 शाळांमध्येच पाचवीचे आणि अवघ्या 47 शाळांमध्येच आठवीचे वर्ग सुरू होऊ शकले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अडीच हजार शाळांत पाचवी? 
राज्य सरकारने पाचवी, आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी लादलेल्या जाचक अटी कमी केल्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजार शाळांमध्ये पाचवीचा वर्ग सुरू होऊ शकणार आहे. हे वर्ग मंजुरीचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निर्णयातील ठळक तरतुदी 
- माध्यमिक शाळांमधील पाचवीच्या वर्गाचे प्राथमिक शाळांत समायोजन. 
- संस्थेची प्राथमिक शाळा असल्यास पाचवीचा वर्ग संस्थेच्याच प्राथमिक शाळेत वर्ग होणार. 
- संस्थेची प्राथमिक शाळा नसल्यास, जिल्हा परिषद शाळेत समायोजन होणार. 
- माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे संस्थेच्याच अन्य शाळांत समायोजन. 
- यापुढे माध्यमिक शाळांमधील पाचवीचे प्रवेश बंद. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद शाळांमध्ये पाचवी, आठवीचे वर्ग सुरू करण्यास किमान अंतर आणि पटसंख्येची जाचक अट घातली होती. ती अट आता दूर झाली आहे. यामुळे सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवीचा नवीन वर्ग सुरू करता येणार आहे. या निर्णयाने जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. 
- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पुणे 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: secondary schools in the state will have classes from class VI