आजपासून शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण! शिक्षकांनी घेऊन यावे स्वत:चे जेवण, प्रत्येक तासाला हजेरी, ५० टक्के गुणाचेही बंधन; ‘डायट’कडून सूचना

राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण २ ते १२ जूनपर्यंत चालणार आहे. त्यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणात भोजन, अल्पोहार व चहाची सोय नसल्याने प्रशिक्षणार्थींनी स्वत:चे जेवण स्वत:च घेऊन यावे, अशा सूचना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने दिल्या आहेत.
zp schools
zp schoolssakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरसह राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील जे शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र आहेत, त्यांचे प्रशिक्षण उद्यापासून (ता. २) सुरू होत आहे. २ ते १२ जूनपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. त्यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणात भोजन, अल्पोहार व चहाची सोय नसल्याने प्रशिक्षणार्थींनी स्वत:चे जेवण स्वत:च घेऊन यावे, अशा सूचना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने दिल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ९०६ शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. त्यात प्राथमिकचे ४२१ शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी तर ६९० शिक्षकांची निवडश्रेणीसाठी नोंदणी झाली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ५५३ शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी तर २४२ शिक्षक निवडश्रेणीसाठी प्रशिक्षण घेणार आहेत. या सर्वांची प्रशिक्षणाच्या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता उपस्थिती आवश्यक असून सकाळी १० वाजता त्यांची हजेरी घेतली जाणार आहे. प्रत्येक तासाला हजेरी घेऊन ती ऑनलाइन ‘एससीईआरटी’ला अपलोड केली जाणार आहे.

१० दिवसांच्या प्रशिक्षणात एक वेळेची स्वाक्षरी हजेरी पटावर नसेल तर त्या प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यांना पुढच्या वर्षीच पुन्हा नव्याने नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.

कला व क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तरीय सात दिवसांचे प्रशिक्षण हे नियमित प्रशिक्षण वर्गासोबत (२ ते ९ जूनपर्यंत) होईल. त्यानंतर १० ते १२ जून या काळा त्यांचे प्रशिक्षण पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये होणार असून त्यासाठी त्या शिक्षकांची उपस्थिती आवश्यक असेल, असेही त्यांनी सांगितले.

चाचणीत ५० टक्के गुणाचे बंधन

वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींना दररोज ऑनलाइन चाचणी, स्वाध्याय, नवोपक्रम, कृती संशोधन व प्रकल्प या सर्वांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी शिकत असलेल्या विषयांची किमान पाठ्यपुस्तके, प्रश्नपत्रिका व लेखन साहित्य सोबत ठेवावे लागेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा, एसक्युएएएफ असे साहित्य ‘एससीईआरटी’ने संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. प्रशिक्षणस्थळी वेळेत न पोचल्याने, दुसऱ्याच प्रशिक्षणस्थळी गेल्याने, ऑनलाइन चाचणी वेळेत न सोडविल्याने होणाऱ्या नुकसानीस प्रशिक्षणार्थी स्वत: जबाबदार असतील. प्रत्येकाकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल असावा आणि त्यात चार्जिंग पुरेशी असावी, अशाही सूचना ‘डायट’ने दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com