राज्यात १२ हजार सार्वजनिक ग्रंथालयांची सेवा ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद

Services of 12000 public libraries in Maharashtra will remain closed till 30 June
Services of 12000 public libraries in Maharashtra will remain closed till 30 June

सोलापूर : माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे साधन म्हणून पुस्तकांकडे पाहिले जाते. शिक्षणाच्या प्रसारासाठी, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचे प्रमुख केंद्र म्हणून ग्रामीण भागात सार्वजनिक ग्रंथालयांकडे पाहिले जाते. अजूनही अनेक गावात फक्त एका ठिकाणी वर्तमानपत्र येतात. तिथे सर्वजन एकत्र येऊन वाचन करतात. ते ठिकाण म्हणजे वाचनालय! मात्र, करोना व्हायरसमुळे वाचनालयातील सेवा सुद्धा बंद करण्याची वेळ आली आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील नागरिकांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सर्व क्षेत्रातील परिपूर्ण माहिती मिळावी, यासाठी सार्वजनिक ग्रंथालये सुरु केली. नागरिकांची वाचनाच्या आवडीची जोपासना करणे आणि सार्वजनिक ग्रंथालय प्रणालीचा विकास करून 'गाव तेथे ग्रंथालय' हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रात सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाचे काम सुरु आहे. मात्र करोना व्हायरसचा याला फटका बसला आहे. ग्रंथालय देवाणघेवाणीतून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे कारण करत ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचे परिपत्रकाद्‌वारे कळवण्यात आले आहे.

हेही वाचा : शिवसेनेच्या वचननाम्यातील ‘या’ योजनेमुळे ‘एवढ्या’ जणांना मिळाला लाभ
काय आहे परिपत्रक

राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांच्या सहीने हे परिपत्रक असून यामध्ये म्हटले की, राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रबिंधात्मक उपाय म्हणून राज्यातील लॉकडाउन कालावधी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक व शासकीय ग्रंथालयांनी चर्चासत्रे, ग्रंथोत्सव, कार्यशाळा, अधिवेशन, सार्वजनिक कार्यक्रम व ग्रंथालय सेवा बंद ठेवाव्यात. ग्रंथालय सेवा सुरु केल्याने ग्रंथ देव- घेव कक्षात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परस्थितीत ३० जूनपर्यंत सेवा बंद ठेवाव्यात.

ग्रंथालयांचा उद्देश
नागरिकांमध्ये माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे उत्कृष्ट साधन म्हणून ग्रंथ उपयोगी आहेत. म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जा केंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात अजूनही ग्रंथालयामध्ये वाचनासाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचे प्रमुख केंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालय प्रणाली सरकारने विकसित केली आहे. राज्यात ग्रामीण आणि शहरी विभागातील नागरिकांमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सर्व क्षेत्रातील विविध बाबींची आणि विविध विषयांची परिपूर्ण माहिती देण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावतात. नागरिकांच्या वाचनाच्या आवडीची जोपासना करणे आणि सार्वजनिक ग्रंथालय प्रणालीचा विकास करून गाव तेथे ग्रंथालय हे घोषवाक्य टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याचे, जनकल्याणकारी राज्य म्हणून सरकारचे उद्दीष्ट आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ग्रंथालयांकडून गावांमध्ये महत्त्वाची सेवा

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल वाघमारे म्हणाले, लॉकडाउनमध्ये पुस्तक वाचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन पुस्तकाची सेवा सुरु आहे. सरकारच्या सूचनांचे पालन करुन गावामध्ये ग्रंथालये सेवा देतात. नागरिकांना पुस्तक हवे असेल तर कर्मचाऱ्यांना सांगतात, त्यानुसार त्यांना हवे ते पुस्तक देतात. एवढी सेवा सुरु असताना मात्र, सरकारकडून ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे मनधन वेळेत मिळत नसल्यांची खंत त्यांनी व्यक्त केली. काही जिल्ह्यांमध्ये २४ मार्चच्या आधी बीले जमा झाली होती. त्यांचे मानधन मिळाले आहे. मात्र त्यांनतरच्या जिल्ह्यात मानधन मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सहा विभागात अशी आहेत वाचनालये...
अमरावती विभाग : २०४१
औरंगाबाद : ४२६९
नागपूर : ११०८
नाशिक : १६७०
पुणे : ३१४५
मुंबई : ६२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com