ब्रेकिंग : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्थापन होणार 'ही' नवी सात मंत्रालये?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन सात मंत्रालये स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन सात मंत्रालये स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षातील अनेक नेते हे नाराज आहेत. या नाराजीवर वाढीव मंत्रालय हा उतारा ठरु शकतात. वाढीव मंत्रालये स्थापन करून सरकार नाराज नेत्यांना या मंत्रालयाचा कारभार सोपवत सरकार नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असे असतील नवीन मंत्रालय

तत्पूर्वी, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून या मंत्रिमंडळात शिवसेना आणि राष्ट्रावादीसोबत काँग्रेसच्या मंत्र्यांनी मिळून एकूण ३६ आमदारांनी शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर तिन्ही पक्षातील काही आमदार नाराज आहेत. ही नवीन मंत्रालये स्थापन करून काही नाराज आमदारांची नाराजी घालवण्याचा यातून प्रयत्न राहील, असेही सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven new ministries may be set up in Maharashtra