
वसमत: कुस्तीच्या आखाड्यात सर्वोच्च बहुमान असलेल्या महाराष्ट्र केसरीचे ध्येय उराशी बाळगलेल्या सात वर्षांच्या तुकाराम उर्फ गोलूने मागील दोन वर्षांपासून मराठवाड्यातील यात्रा गाजवल्या. तब्बल दोनशे कुस्तीनंतरही अजिंक्य राहिलेल्या गोलुची चांगलीच धडकी प्रतिस्पर्धी स्पर्धकामध्ये आहे. काही सेकंदात प्रतिस्पर्धकाला चित करणाऱ्या गोलूची दहशत कुस्तीच्या आखाड्यात दिवसेंदिवस वाढतच आहे.