

A representative image depicting a late-night police search in a residential colony, with worried residents and a box of rasgullas highlighting the unusual twist in the Shahada incident
esakal
शहादा शहरातील वृंदावन नगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका अनपेक्षित प्रकारामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरांचे दरवाजे जोरजोरात वाजू लागल्याने परिसरात दरोडेखोर शिरल्याची भीती पसरली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण कॉलनीतील नागरिक जागे झाले. काही वेळातच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी सतर्क होत एकमेकांना माहिती दिली, तर घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, जवळपास तासभर सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर समोर आलेले कारण ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.