लग्नानंतर देवदर्शनला न जाता नवदाम्पत्य थेट उदयनराजेंच्या दर्शनाला

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Summary

वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सातारा : वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) थेट 13 वे वशंज खासदार उदयनराजे हे नेहमीच आपल्या हटके स्टाइलने चर्चेत असतात. तसेच त्यांचे चाहते त्यांच्या स्टाईलवर भरभरून प्रेम करताना दिसतात. परंतु, नांदेडचे (Nanded) एक नवदाम्पत्य जोडपे लग्नानंतर चक्क देवदर्शनाला न जाता थेट साताऱ्यातील जलमंदिरमध्ये उदयनराजे भोसले यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यामुळं उदयनराजे यांची महाराष्ट्रातील विविध कोपऱ्यात असलेली क्रेझ पुन्हा एकदा पहायला मिळाली.

उदयनराजे हे साताराच नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला आहे. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीत लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य देव-देवतांचे दर्शन जाण्याची परंपरा आहे. पण, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13 वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नांदेडवरून आलेले शहाजी शंकरराव काळे (Shahaji Kale) व नवविवाहिता पत्नी मनीषा शहाजी काळे (Manisha Kale) या नवदाम्पत्यांनी थेट जलमंदिर गाठलं आणि त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे आशीर्वाद घेतले.

Udayanraje Bhosale
Political News : दोन दिवसांत ठरणार अध्यक्षपदाचा 'हुकमी एक्का'

यावेळी पत्रकारांशी बोलताना शहाजी काळे म्हणाले, माझं लग्न आजच झालं असून कोणत्याही देवदर्शनाला न जाता मी खासदार उदयनराजे भोसले यांचं दर्शन घेण्यासाठी साताऱ्यात आलो आहे. आम्हाला महाराजांनी आशीर्वाद दिल्याने मी त्यांचे आभार मानलो. मनीषा काळे यांनीही महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो, त्याचं असं दर्शन मिळणं, हे आमचं भाग्य समजतो, असंही त्या म्हणाल्या.

Udayanraje Bhosale
NCP, BJP, काँग्रेससह शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com