
शहाजी पाटलांचं, "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील", विधानसभेतही ''ओके"मध्ये
मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर रिंगणात असून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रियेत प्रत्येकाला उभं राहून आपलं नाव आणि क्रमांक उच्चारावा लागतो. यावेळी विधानसभेत आमदार शहाजीबापू पाटील उभे राहताच इतर सदस्यांनी खाली बसून घोषणाबाजी केली. (Shahaji Patil in Vidhansabha for voting)
काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या 35 हून अधिक आमदारांना घेऊन आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं होतं. गुवाहाटी येथे बंडखोर आमदारांचा मुक्काम लांबला होता. यावेळी अनेक आमदारांच्या फोन रेकॉर्डींग व्हायरल झाल्या. यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची फोन रेकॉर्डींग चांगली व्हायरल झाली.
शहाजी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याशी बोलतना आपल्या रांगड्या भाषेत "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील," अशा शब्दात गुवाहाटी येथील हॉटेल परिसराचे वर्णन केलं होतं. त्यांनी केलेलं ते वर्णन प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यावर गाणे देखील आले.
दरम्यान विधानसभेत आज मतदान प्रक्रियेच्या वेळी जेव्हा शहाजी बापू उभे राहिले, त्यावेळी इतर विधानसभा सदस्यांनी "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील" शहाजी बापूंना डिवचलं. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता.
Web Title: Shahaji Patil In Vidhansabha For
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..