Sharad Pawar Withdraw Resignation : शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मागीतली माफी; म्हणाले, फक्त अजित पवारांना...

Sharad Pawar Apologize to party leaders Said Ajit Pawar knew about Resignation as president of ncp
Sharad Pawar Apologize to party leaders Said Ajit Pawar knew about Resignation as president of ncpesakal

Sharad Pawar Withdraw Resignation : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेतला आहे. २ मे रोजी लोक माझे सांगाती या त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी हा निर्णय जाहीर केला होता. मात्र आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. यावेळी शरद पवारांनी सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांची माफी देखील मागीतली.

राज्याभरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्तांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर शरद पवार यांनी त्यांच्या पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. मात्र या पत्रकार परिषदेला पक्षाचे नेते अजित पवार हे उपस्थित राहिले नाहीत. याविषयी विचारले असता शरद पवारांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न विचारत उत्तर दिलं. पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार असतात का? असे पवार म्हणाले.

Sharad Pawar Apologize to party leaders Said Ajit Pawar knew about Resignation as president of ncp
Sharad Pawar : रोहित पवारांसकट तरुण नेते हजर, पण अजित पवार गैरहजर; शरद पवार म्हणाले...

यानंतर अजित पवारांच्या नाराजींच्या चर्चेविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, सरळ बाब आहे, मला माफ करा मी तुम्हा सगळ्यांचे (उपस्थित इतर नेत्यांचं) मत घेतले नाही. पण हा माझा विचार आहे असं मी अजित पवार यांना सांगितलं होतं. त्यामुळे याबद्दल अजित पवारांना कल्पना होती. मात्र बाकी नेत्यांना याबद्दल कल्पना नव्हती, असं म्हणत पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची माफी मागितली.

Sharad Pawar Apologize to party leaders Said Ajit Pawar knew about Resignation as president of ncp
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली रश्मी अन् तेजस ठाकरेंची भेट? श्रीकांत शिंदे म्हणतात...

राजीनामा मागे घेताना शरद पवार म्हणाले की, देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे.

माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय याचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

तसेच त्यांनी यापुढे पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाचे विचारधारा ध्येय धोरणे जन माणसात पोहचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन असे अश्वासन यावेळी देशभरातील कार्यकर्त्यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com