ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे उद्या(ता.27) दुपारी दोन वाजता ईडी (अंमलबजावणी संचालनालय) मुंबईच्या कार्यालयात जाणार आहेत. यावेळी त्यांनी ईडीच्या कार्यालयाकडे कार्यकर्त्यांनी जमू नये असे म्हटले आहे. पोलिस किंवा तपास यंत्रणा यांना सहकार्य करण्याचे आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे उद्या(ता.27) दुपारी दोन वाजता ईडी (अंमलबजावणी संचालनालय) मुंबईच्या कार्यालयात जाणार आहेत. यावेळी त्यांनी ईडीच्या कार्यालयाकडे कार्यकर्त्यांनी जमू नये असे म्हटले आहे. पोलिस किंवा तपास यंत्रणा यांना सहकार्य करण्याचे आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

लोकांना त्रास होईल असे कृत्य करू नका, असेही त्यांनी यावेळी राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. उद्या दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयात शरद पवार जाणार आहेत, त्याआधी त्यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटरवरून मी येतोय... बेबंदशाहीला शह देण्यासाठी अशा आशयाचे ट्विट करण्यात आले आहे. तर शरद पवार हे उद्या ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, मी येतोय ही टॅगलाईन घेऊन उद्यापासून राष्ट्रवादी राज्यभर प्रचार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या 'मी येतोय' असे फलक आणि बॅनर मुंबईत झळकणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar appeal to his Partyworkers after ED action