

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत एक महत्त्वाचा वक्तव्य केलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला विरोध करत त्यांनी त्यावर निषेध व्यक्त केला. गोपीचंद पडळकर यांनी मारकरवाडी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर तीव्र टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "१०० शकुनी मेले तेव्हा शरद पवार जन्माला आले."