
Sharad Pawar : महापुरुषांबद्दल राज्यकर्त्यांना तारतम्य नाही; शरद पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका
कऱ्हाड : कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःची संस्था चालवताना तेथील मुलांना दोन वेळचे अन्न नसल्याने स्वतःच्या पत्नीचे दागिने विकले आणि मुलांना शिकवले ते भिक नव्हते मागत. महापुरुषांनी दिलेले योगदान असुनही त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणे चुकीचे आहे. वक्तव्याबद्दलचे तारतम्य आजकालच्या राज्यकर्त्यांना नाही असे म्हणत खासदार शरद पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना नाव न घेता टोला लगावला. खासदार पवार आज कऱ्हाड (जि.सातारा) दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील आदी उपस्थित हेते.
महापुराषाबद्दल नेते, मंत्री यांच्याकडुन केलेल्या जात असलेल्या वक्तव्य बाबत खासदार पवार म्हणाले, महापुरुषाबाबत कोणी काय चुकीचं बोललं तर लोकांना संतापच येणारच. भीक मागून शिक्षण संस्था चालवल्या, मात्र कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःची संस्था चालवताना तेथील मुलांना दोन वेळचे अन्न नसल्याने स्वतःच्या पत्नीचे दागिने विकले आणि मुलांना शिकवले ते भिक नव्हते मागत. महापुरुषांनी दिलेले योगदान असुनही त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. याच्याबद्दलचे तारतम्य आजकालच्या राज्यकर्त्यांना नाही, असे म्हणत त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना नाव न घेता टोला लगावला. त्याचबरोबर राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यासंबधी केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल असेही यावेळी स्पष्ट केले