
पुणे : ‘‘असंघटित कष्टकरी कामगारांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य समजून डॉ. बाबा आढाव यांनी स्वतःला त्या कार्यात वाहून घेतले. असंख्य कष्टकऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता आणण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी ‘एक गाव एक पाणवठा’, देवदासी प्रथा, पालखीतील जातिभेदाविरुद्ध आंदोलनाद्वारे समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा बाबा महत्त्वाचा भाग आहेत,’’ असे मत ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.