Sharad Pawar: निर्णय समिती स्थापन! पक्षाची धुरा 'या' नेत्याच्या खांद्यावर जाण्याची शक्यता; लवकरच निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत विविध नावांची चर्चा
Sharad Pawar
Sharad Pawar esakal

राज्याच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा ‘पवार’फुल वादळ घोंघावलं. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा करताच नेते आणि कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा अक्षरशः बांध फुटला. ‘‘साहेब... आम्हाला तुम्हीच हवे आहात, निर्णय मागे घ्या,’’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर दणाणून सोडले होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी केल्यानंतर पवार ‘सिल्व्हर ओक’वर रवाना झाले. नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ‘फेरविचारासाठी दोन दिवस द्या,’ असे पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar
Ajit Pawar: ...तर आमदार निधी सात कोटींवर नेणार होतो; अजित पवारांचे प्रतिपादन

मात्र सध्यातरी पवार राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यांनी ही भूमिका कायम ठेवली, तर ताई, दादा की अन्य कोणाकडे नेतृत्वाची धुरा सोपविली जाईल, याची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज पार पडला. याच कार्यक्रमामध्ये पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली.

पवारांच्या या घोषणेनंतर कार्यक्रमाचा सगळा नूरच पालटला. काही कार्यकत्यांचा अचानक बांध फुटला, नेत्यांनी व्यासपीठावर धाव घेत... ‘‘साहेब, निवृत्त होऊ नका, निर्णय मागे घ्या’... अशी विनंती केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड आदी नेते भावुक झाले होते, त्यांनाही अश्रू अनावर झाले होते.

Sharad Pawar
Sharad Pawar : श्रीकृष्णासारखे जागेवर बसुन मार्दर्शन केले तरही कलाटणी घडवण्याची ताकद; खासदार श्रीनिवास पाटील

कार्यकर्त्यांचा आवेग पाहून स्वतः पवार आणि प्रतिभाताई यादेखील भावुक झाल्या होत्या. वाय. बी. सेंटरमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये पवार तब्बल दोन ते अडीच तास बसून होते. प्रत्येक जण आपापले म्हणणे मांडत होता.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज पार पडला. याच कार्यक्रमामध्ये पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली.

पवारांच्या या घोषणेनंतर कार्यक्रमाचा सगळा नूरच पालटला. काही कार्यकत्यांचा अचानक बांध फुटला, नेत्यांनी व्यासपीठावर धाव घेत... ‘‘साहेब, निवृत्त होऊ नका, निर्णय मागे घ्या’... अशी विनंती केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड आदी नेते भावुक झाले होते, त्यांनाही अश्रू अनावर झाले होते.

कार्यकर्त्यांचा आवेग पाहून स्वतः पवार आणि प्रतिभाताई यादेखील भावुक झाल्या होत्या. वाय. बी. सेंटरमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये पवार तब्बल दोन ते अडीच तास बसून होते. प्रत्येक जण आपापले म्हणणे मांडत होता.

धुरा कोणाकडे?

पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून दोन दिवसांत तुमच्या भावनांचा विचार करून निर्णय घेऊ, अशी भूमिका मांडली. परंतु, पवार यांची निर्णय घेण्याची पद्धत पाहता ते आपला निर्णय सहज बदलण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष तयार व्हावा, अशी भूमिका अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांची समजूत काढताना व्यासपीठावरूनच मांडली होती.

शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वीच (२७ एप्रिल) ‘भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे. ती वेळीच फिरविली नाही तर करपते,’ असे वक्तव्य केले होते. या सर्वांचा विचार करता अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे द्यायची याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात खासदार सुप्रिया सुळे, सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आदी नावांबाबत अंदाज बांधला जात आहे.

निर्णयासाठी समिती स्थापन

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील नवा अध्यक्ष नेमण्यापासून इतर महत्त्वाच्या निर्णयांसाठी विशेष समिती स्थापन केल्याचेही पवार यांनी भाषणात जाहीर केले. या समितीत माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, फौजिया खान, जितेंद्र आव्हाड, जयदेव गायकवाड, धीरज शर्मा यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com