esakal | मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपला लोकांनी वेडी ठरवलं - पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपला लोकांनी वेडी ठरवलं - पवार

sakal_logo
By
ओमकार वाबळे

सोलापूरमध्ये राष्ट्रादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतोय, असा टोला पवार यांनी लगावला. आजचं केंद्र सरकार देशातील रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्याचं काम करत आहे. नेहरूंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भर देण्यात आला. मात्र, मोदी सरकार सर्व गोष्टी व्यापाऱ्यांच्या हातात देत आहे. बंदरं, विमानतळं, दळणवळणाची साधनं या सर्व गोष्टींच्या खासगीकरणाचे प्रयत्न केंद्राचे सुरू आहेत, असे पवार म्हणाले.

वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचंही शरद पवार म्हणाले. त्यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. शेतीप्रधान देशात शेतकऱ्याची परिस्थिती खालावली. मात्र, सरकारने शेतकऱ्यांना मदत पोहोचवली नाही. उलट शांत मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप सरकारने गाड्या घातल्या.

भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन पवार यांनी केले.

५० टक्के जागा महिलांना

सोलापूरच्या महानगपालिका निवडणुकांसाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाषण दिलं. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांसाठी महिलांना ५० टक्के जागा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडून ५० टक्के महिलांना तिकीट वाटप होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

"सरकारी पाहुण्यांची चिंता आम्हाला नाही"

मागील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या घरी आणि संबंधित व्यक्तींच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. यावर बोलताना शरद पवारांनी भाजपला टोला लगावला. अजित पवारांच्या घरी पाठवलेल्या सरकारी पाहुण्यांची आम्हाला चिंता नाही. कोणत्याही पाहुण्यांची आम्हाला कधीच चिंता नसते, असे पवार म्हणाले. तसेच माझा संबंधही नसलेल्या बँकेशी मला जोडून ईडीने नोटीस पाठवली. यानंतर लोकांनी भाजपला वेडी ठरवली, असं पवार म्हणाले.

loading image
go to top