esakal | शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृतीबाबत राजेश टोपेंनी दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad_Pawar

सोमवारी अचानक पोटात दुखू लागल्यानं रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती.

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृतीबाबत राजेश टोपेंनी दिली माहिती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पोटात दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पित्तनलिकेच्या मुखाशी असलेला खडा काढण्यात आला. पुढचे दोन ते तीन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सोमवारी अचानक पोटात दुखू लागल्यानं रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. शस्त्रक्रिया बुधवारी होणार होती. मात्र, मंगळवारी पुन्हा अचानक त्रास सुरु झाल्यानं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचाही तुटवडा वाढला

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image