शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एसटी संपाबाबत कृती समितीची बैठक | ST Strike Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Strike Update
शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एसटी संपाबाबत कृती समितीची बैठक

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एसटी संपाबाबत कृती समितीची बैठक

मुंबई : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी (Maharashtra State ST Staff) संघटनेने संपातून माघार घेऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी(ST workers) विलीनीकरणाशिवाय माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे सोमवारी (ता. १०) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(NCP President Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: कोरोना संकट निवारण्यासाठी औरंगाबादमध्ये आजपासून बूस्टरची मात्रा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप नेतृत्वहीन असल्याने राज्य सरकारने चर्चा तरी कोणाशी करायची, असा पेच निर्माण झाला आहे. यापूर्वी कृती समितीशी चर्चा करून घरभाडे, महागाई भत्त्याची वाढ देण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून वेतनवाढ देण्यात आली, तर संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्याशी चर्चा करून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतरही एसटी कर्मचारी मात्र, अद्याप संपावर कायम आहेत.

हेही वाचा: कोरोना संकट निवारण्यासाठी औरंगाबादमध्ये आजपासून बूस्टरची मात्रा

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला महत्त्व निर्माण झाले आहे. विलीनीकरणाची मागणी असली तरी ५० टक्के कर्मचारी वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढल्यास संपातून माघार घेण्यास तयार आहेत. त्यामुळे सर्व पर्यायांवर बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top