शरद पवारांचा केंद्रावर हल्ला; म्हणाले, सत्ता असताना दिल्ली सांभाळता येत नाही

Sharad Pawar
Sharad Pawarsakal media

कोल्हापूर : दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चांगलाच राडा झाला होता. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. दगडफेक करण्यात आली होती. केंद्रात भाजपची सत्ता आहे. मात्र, तुम्हाला दिल्ली सांभाळता आली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. दिल्लीतील हिंसाचारावरून शरद पवार (sharad pawar) यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली.

कोल्हापूरच्या (kolhapur) तपोवन मैदानात आयोजित संकल्प सभेत (sankalp sabha ) शरद पवार बोलत होते. संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. देश एकसंघ ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. आज देशासमोर वेगळं आव्हान आहे. सुरू असलेल्या विविध घटनांमुळे देशात अस्थिरता आहे असा संदेश जगात जात आहे, असेही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
नवरदेव व सख्या भावासह मित्राचा मृत्यू; विसपुते कुटुंबावर काळाचा घाला

भाजपने सत्ता डोक्यात घालून घेऊ नये

जगभरातील नेते भारतात आले की गुजरातमध्ये जातात. आधीचे नेते भारत दर्शन करायचे. आता बाहेरून येणारे नेते गुजरात दर्शन करतात. संकुचित विचार देशाच्या भवितव्यासाठी योग्य नाही. भाजपने (BJP) सत्ता डोक्यात घालून घेऊ नये, असेही शरद पवार (sharad pawar) म्हणाले.

शिवाजी महाराजांचं नाव अंतःकरणात

शिवाजी महाराजांचं नाव अंतःकरणात आहे. ३०० ते ४०० वर्षांनतरही शिवरायांची आठवण येते. जोतिबा फुलेंनी शिवरायांचा इतिहास सांगितला. चुकीचा इतिहास त्यांनी सांगितला नाही, असे म्हणत शरद पवार (sharad pawar) यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

पण आज चित्र वेगळे दिसते

२०१४ ची निवडणूक वेगळी झाली आणि भाजपच्या हातात देशाची सत्ता गेली. लोकांचा कौल होता. सत्ता हातात आल्यानंतर त्याचा उपयोग सामान्य माणसामध्ये एक वाक्यता राहील, देश एकसंघ राहील, समाजाचे सगळे घटक एका विचाराने राहतील कसे, यासाठी होईल असे वाटले होते. किंबहुना ही सरकारची जबाबदारीच असते; पण आज चित्र वेगळे दिसते, असेही शरद पवार म्हणाले.

केजरीवाल मुख्यमंत्री असले तरी तिथले गृहखाते भाजपच्या हातात

गेले काही दिवस देशाची राजधानी दिल्लीत संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी जाळपोळ झाली. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असले तरी तिथले गृहखाते भाजपच्या हातात आहे. गृहमंत्री अमित शहा आहेत. गृह खात्याची जबाबदारी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी राजधानी एकसंघ राहील, याची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पण ती घेतली नाही.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com