पडळकर म्हणतात तसं अभिवादन करताना शरद पवारांच नेमकं काय चुकलं होतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

पडळकर म्हणतात तसं अभिवादन करताना शरद पवारांच नेमकं काय चुकलं होतं?

काल सुभेदार मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांनी अभिवादन करण्यासाठी एक ट्वीट केलं आणि त्यानंतर त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ट्वीट करताना त्यांची एक चूक झाली अन् पवारांच्या त्या ट्वीटचा स्क्रीनशॉट काढून भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली. धनगर समाजाचे नेतृत्व समजले जाणारे गोपीचंद पडळकर सारखे कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून चर्चेत असतात. त्यांनी काल ट्वीट करत "लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये, तुम्ही कितीही थापा मारल्या तरीही आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय राहणार नाही" असं ट्वीट केलं आणि शरद पवारांच्या अकाउंटवरून त्या ट्वीटमध्ये सुधारणा करण्यात आली.

झालं असं की, काल मल्हारराव होळकरांची पुण्यतिथी होती. शरद पवारांनी त्यांना अभिवादन करणारे ट्वीट केले. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी "स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी मल्हारराव होळकर यांनी आपले आयुष्य समर्पित केले. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. शूरवीर सेनानी राजे मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन" असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. पण झालं असं की, त्यांनी ट्वीट करताना मल्हाररावांचा फोटो लावण्याऐवजी चुकून महाराजा यशवंतराव होळकरांचा फोटो लावला. त्यानंतर चूक लक्षात आल्यावर त्यांनी लगेच पोस्टमध्ये दुरूस्ती केली पण तोपर्यंत यावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या.

शरद पवारांचं चुकलेलं ट्वीट म्हणजे पडळकरांसाठी टीकेला घबाड सापडल्यासारखंच म्हणावं लागेल. कारण पडळकर हे सारखे विरोधकांवर टीका करत असतात. त्यानंतर पडळकर यांनी पवारांच्या या ट्वीटचा स्क्रीनशॉट काढला आणि आपल्या ट्वीटरवर टाकत शरद पवारांवर टीका केली. ट्वीट करत ते म्हणाले की, पवारांना सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचा फरक कळत नाही.

ज्यांना या दोन शूरांमधील फरक कळत नाही त्यांना आमच्या समाजाच्या समस्या काय कळणार? असा सवाल करत "अशा लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये. तुम्ही कितीही थापा मारल्या तरी आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. जय मल्हार." असं ट्वीट करत पडळकरांनी शरद पवारांना त्यांची झालेली चूक दाखवून दिली आणि नंतर त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली.

तसा विचार करायचा झालाच तर तुम्हाला माहिती असेल की, मोठ्यामोठ्या राजकारण्यांचे सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्यासाठी काही व्यक्ती असतात. त्यांच्या दौऱ्याची, भेटीची, किंवा एखाद्या कार्यक्रमाची माहिती ही व्यक्ती त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रसारित करत असतात. सर्वंच राजकारण्यांच्या बाबतीत असं होत नाही पण शरद पवारांच्या कालच्या ट्वीटमध्ये जी चूक झाली ती कदाचित सोशल मीडिया हाताळणाऱ्या व्यक्तींकडूनही झाली असू शकते.

Web Title: Sharad Pawar Malharrao Holkar Death Anniversary Gopichand Padalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..