esakal | शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

CM-Uddhav-Thackeray-Sharad-Pawar

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक 30 मिनिटे चालली. या बैठकीमध्ये महाविकासआघाडीतील सुसूत्रता तसेच राज्यातील इतर विषयांबाबतही चर्चा झाली. शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीमध्ये कृषी विभागाबाबत देखील चर्चा झाल्याचं समजतंय, असंही सूत्रांनी म्हटलंय.

हेही वाचा: अल्पवयीन मुलाच्या हत्त्येप्रकरणी पोलिसांची हत्तीणीवर कारवाई!

गेल्या दीड महिन्यांमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेली ही दुसरी भेट आहे. महाविकासआघाडीत धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आणखीनच महत्त्वाची मानली जात आहे. मुख्यमंत्र्याशी झालेल्या या बैठकीच्या आधी शरद पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदिती तटकरे आणि एकनाथ खडसे यांच्याशी मुंबईत भेट घेतली. एकनाथ खडसे यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये बैठक घेतली. सध्या खडसे यांची ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु आहे. ईडीने खडसे यांचे जावाई गिरीश चौधरी यांना अटक केली असूनत्यांना 19 जुलैपर्यंत ईडीची कस्टडी सुनावली आहे.

हेही वाचा: 'ही राजकीय सूडवृत्तीच'; मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्टवर ममतांचा पलटवार

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा शरद पवार हेच या सरकारचे रिमोट कंट्रोल असल्याचं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, यात काहीच शंका नाहीये की, शरद पवार हेच महाराष्ट्र सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत. आम्ही कोणत्याच मोठ्या नेत्याविरुद्ध वक्तव्य करत नाही. मात्र, इतरांनी याकडे बघण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचं पहावं.

loading image