महाराष्ट्राच्या राजकारणात 'कहानी में ट्विस्ट'; शरद पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

एक आठवडा झालाय. महाराष्ट्रात शिवसेना भाजपची भांडणं आता महाराष्ट्राला रोजची झालीयेत. कोण होणार मुख्यमंत्री ? कोण होणार मुख्यमंत्री? या प्रश्नाचा आता पीट्टा पडलाय. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस आणखीनच वाढत चाललाय. अशातच आता एक वेगळीच, मोठी बातमी समोर येतेय. ही बातमी महाराष्ट्रातील राजकारण बदलून टाकणारी अशीच आहे. 

भाजप आणि शिवसेनेला सरकार स्थापन करण्यास अपयश आलं तर, आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास कॉंग्रेससोबत शिवसेना NCP ला पाठींबा देण्याच्या चर्चा आहेत. असं झाल्यास शरद पवार मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. 

आज  शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर अजित पवारांनी तसे संकेतही दिलेत.  

काय म्हणालेत अजित पवार ?

शिवसेना समसमान सत्तावाटपावर ठाम आहे. अशात भाजप ही 50-50 चं सूत्र थेट नाकारताना दिसतेय. त्यामुळे आता शिवसेनेकडून सत्तास्थापनेचे वेगळे पर्याय पडताळून पाहत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात. आजच राज ठाकरे आणि शरद पवारांची भेट झाली. शरद पवार सोनिया गांधी यांची देखील सोमवारी घेणार आहेत. मात्र, या सर्व घडामोडींवर आता भाष्य करणं घाईचं ठरेल. 

sharad pawar might become next cm of maharashtra 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar might become next cm of maharashtra