Sharad Pawar : मी कधीही पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जात नाही, पण...; पवारांनी सांगितलं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar

Sharad Pawar : मी कधीही पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जात नाही, पण...; पवारांनी सांगितलं कारण

चिंचवडः विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वेसर्वा शरद पवार आज चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, आम्ही चाकण, रांजणगाव, जेजुरी या ठिकाणी एमआयडीसी सुरू केली, असा विचार भाजप कधी करणार नाही. विकासाचा व्यापक विचार त्यांच्याकडे नाही, ते केवळ बोलतात असं म्हणून त्यांनी अजित पवार यांच्या कामाचं कौतुक केलं.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

शरद पवार यांनी बोलतांना राजीव गांधी यांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी हे पुण्यात सभेसाठी आले होते, त्यांनी विमानातून गर्दी पहिली, त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले की ती गर्दी शरद पवार यांच्या सभेला झालीय.

पवार पुढे म्हणाले- मी पोटनिवडणूक प्रचाराला जात नाही, पण पक्षाच्या पडत्या काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली त्यांच्याशी दोन शब्द बोलता येईल म्हणून मी इथे आलो.

काय म्हणाले शरद पवार?

  • प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी बोलतांना पवार म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ते कोणाचाही प्रचार करू शकतात

  • चिंचवड इथली निवडणूक भाजपविरुद्ध महविकास आघाडी अशीच होणार आहे. बंडखोरीचा परिणाम होणार नाही.

  • पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठवली गेली नसती, असे सांगत अप्रत्यक्ष या घटनेची माहिती असल्याचं केले कबूल.

  • निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरून निर्णय घेतं हे महत्त्वाचे, त्यांच्या मागे मोठी शक्ती आहे.