ज्यांना बोटावर मोजण्याइतपत आमदारही निवडून आणता येत नाहीत...; पवारांचा राज ठाकरेंना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar vs Raj Thackeray

ज्यांना बोटावर मोजण्याइतपत आमदारही निवडून आणता येत नाहीत...; पवारांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई - पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. पवार म्हणाले की, चौकशी करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास काय कराल असा सवाल राज्य सरकारला शरद पवार यांनी केला आहे. यावेळी पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा: Patra Chawl : पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राणीसंग्रहालयात बांधली गेलीये अशी टीका करण्यात येतेय, यावर शरद पवार यांनी मनसेच्या आरोपांचा समाचार घेतला. पवार म्हणाले की, ज्यांना विधीमंडळात बोटावर मोजण्याइतपतही आमदार निवडून आणता येत नाही, त्या पक्षाबाबत काय भाष्य करायचं, असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.

हेही वाचा: Modi Cabinet : लॉजिस्टिक्स पॉलिसीला मंजूरी; वाचा मोदींनी मंजूर केलेले महत्त्वाचे निर्णय

राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मनसेकडून अधुनमधून शरद पवार यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्याला आज पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या व्यतिरिक्त शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारण आणि विरोधकांच्या एकजूटीच्या प्रयत्नांवर भाष्य केलं.

Web Title: Sharad Pawar On Raj Thackeray Ncp Mns

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..