पुढील वारस कोण? या प्रश्नावर, शरद पवार म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

रोहित पवार किंवा पार्थ पवार यांच्यातला जो कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल, अशा प्रकारचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तुमचा राजकीय वारस कोण? या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले आहे.

पुणे : रोहित पवार किंवा पार्थ पवार यांच्यातला जो कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल, अशा प्रकारचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तुमचा राजकीय वारस कोण? या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. या मुलाखतीत पवारांचा राजकीय वारसदार कोण असेल, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी आपला कोणालाही पाठिंबा नाही, असे सांगितलं. जो कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल असे स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी आमच्या घरात कोणताही कलह नसल्याचेही स्पष्ट केले. मी आज घरात मोठा आहे. त्यामुळे सगळे माझे ऐकतात. अजितला मी सांगितल्यानंतर तो राज्यात जोराने प्रचार करीत आहे. पक्षाचे काम करीत आहे, असे पवार म्हणालेत.  'ईडी'ने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अजित पवार उद्विग्न झाले होते. याच मनस्थितीत त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यासाठी कोणताही गृहकलह कारणीभूत नाही. पवार घराणे हे एका मताने वागणारे आहे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad pawar says I do not support Rohit pawar or parth pawar