केंद्रात नितीन गडकरीच सहकार क्षेत्राचे खरे तारणहार - शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

ज्यांनी ही बँक उभी करण्यासाठी योगदान दिले त्यांनी तो वारसा पुढेही जपावा.

केंद्रात नितीन गडकरीच सहकार क्षेत्राचे खरे तारणहार - शरद पवार

मुंबई - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना सहकार क्षेत्राविषयी खूप आस्था आहे. ते कायम परखडपणे याविषयी बोलतात, त्याचं मत मांडतात. मात्र केंद्रामध्ये गडकरी हेच सहकार क्षेत्राचे तारणहार आहेत, असे उद्गार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 110 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं शतकोत्तर दशपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत.

हेही वाचा: "१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक"; कंगनाच्या विधानावरून नवा वाद

यावेळी शरद पवार म्हणाले, ज्यांनी ही बँक उभी करण्यासाठी योगदान दिले त्यांनी तो वारसा पुढेही जपावा. नितीन गडकरी यांना सहकार क्षेत्राविषयी खूप आस्था आहे, ते याविषयी नेहमीच परखडपणे मत मांडतात. त्यामुळे केंद्रातील मंत्र्यांपैकी गडकरी हेच सहकार क्षेत्राचे खरे तारणहार आहेत. सहकार क्षेत्रात महत्वाचे काम करणारी संस्था म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. आजवर या बँकेला अनेक कर्तृत्ववान नेतृत्व करणारी माणसं लाभली आहेत. ज्यांनी या बॅंकेच काम नावारुपाला आणलं. माझे वडीलही सहकारी क्षेत्रात काम करत होते. राज्य सरकार आणि बँकेत नेहमीच समन्वय असायचा. यशवंतराव प्रतिष्ठान उभे करण्यासाठी या बॅंकेने 6 कोटींची मदत दिली आहे, असेही ते म्हणाले.

loading image
go to top