esakal | सातारकरांचा मी विशेष आभारी, तेथे जाऊन... : शरद पवार | Election Results
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar says Special thanks to Satara voters Vidhan Sabha election

सातारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. पण, गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांना जनतेने स्वीकारले नाही. सातारकरांचा मी विशेष आभारी आहे. सातारकरांचे मी तेथे जाऊन आभार मानणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

सातारकरांचा मी विशेष आभारी, तेथे जाऊन... : शरद पवार | Election Results

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सातारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. पण, गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांना जनतेने स्वीकारले नाही. सातारकरांचा मी विशेष आभारी आहे. सातारकरांचे मी तेथे जाऊन आभार मानणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत असताना पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळाल्याचे चित्र आहे. पण, गेल्यावेळी मिळालेल्या जागांपेक्षा कमी जागा या दोन्ही पक्षांना मिळाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने मोठे यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. निकाल स्पष्ट झाल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसलेंच्या पराभवाबद्दल भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, की लोकसभेची एक जागा होती त्याकडे सगळ्याचं लक्ष होतं. महाराष्ट्रात सातारच्या गादीबद्दल सगळ्यांना आदर आहे. राज्यपालपद भूषविलेल्या श्रीनिवास पाटील यांना आम्ही संधी दिली होती. सातारच्या जनतेने श्रीनिवास पाटील यांना निवडलं, त्यांचा मी आभारी आहे. सातारला जाऊन मी मतदार जनतेचे आभार मानणार आहे. आम्ही सातारच्या गादीचा सन्मान करतो. पण, ज्यांना चार महिन्यांपूर्वीच जनतेनं निवडून दिलं. त्यांनी कोणतही कारण न सांगता राजीनामा दिला आणि पुन्हा लोकांमध्ये राष्ट्रवादीला आव्हान दिलं. त्यांना जनतेनं स्वीकारलं नाही, हे पहायला मिळत आहे.

loading image