esakal | PowerAT80 : हार के जीतनेवाला बाजीगर!

बोलून बातमी शोधा

PowerAT80, sharad pawar

गडगंज श्रीमंती असलेल्या बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या पुढे जाऊन तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाची निवडणूक जिंकून दाखवत क्रिकेट जगतातील मानाचा पदभार सांभाळला. क्रिकेटसोबतच कुस्ती, कबड्डीसारख्या देशी खेळांच्या संघटनांमध्ये, व्यवस्थापनामध्येही तुम्ही महत्वाच्या भूमिका बजावल्या.

PowerAT80 : हार के जीतनेवाला बाजीगर!
sakal_logo
By
सुशांत जाधव

आदरणीय, साहेब 

बारा वेळा PHD केली काय आणि बारा भानगडी करुन सर्व ताकद पणाला लावली काय ...तुमच्या संदर्भातील पेपरातील अभ्यासात काटावर पास होणं देखील मोठी कसोटीच. एवढेच नाही तर तुमच्या वाटेला गेलेल्याला ग्रेस पास करायचं धाडस कोणी करेल, असे अजिबात वाटत नाही. तेल लावून तयार असलेले पैलवान चितपट झाल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय आणि अनुभवलंय. राजकीय आखाड्यात अपराजित राहिलेल्या तुमच्यावर क्रिकेटच्या मैदानात पराभूत होण्याची नामुष्की ओढावली.  

2004 मध्ये 'भारतीय क्रिकेट नियामक मंडळा'च्या (BCCI) च्या निवडणुकीत दालमियांचा विजय हा 'दाल मे कुछ काला है! असाच असल्याचे तुमच्या समर्थकांना वाटले असेल. खरंतर क्रिकेटच्या मैदानात तुमची इनिंग सुरु झाली ती 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या निवडणुकीत वाडेकरांच्या पराभव करुनच. पण 2004 मध्ये तत्कालिन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडून अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव झालेल्या निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगली.   

शरदचंद्र पवार : अद्भूत किमया करण्याची रुबाबी कसरत करणारा लोकनेता

यापूर्वी क्रिकेट चाहत्यांनी एखाद्या संघाने अटीतटीच्या लढतीत 1 धावेनं पराभूत झालेले संघ पाहिले होते. पण 2004 मध्ये राजकारणाच्या पटलावर कधीही पराभूत न झालेल्या संघनायकाचा 1 मताने पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. यातून कमबॅक करायला तुम्हाला जास्त वेळ लागला नाही. 2005 मध्ये तुम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होऊन दाखवलं. सध्याच्या घडीला लोकप्रिय असलेल्या आयपीएल स्पर्धेचा शुभारंभ झाला तोही तुमच्याच राज्यात.

अंगणवाडी महिलांसंदर्भातील 'ती' बातमी शरद पवारांनी का दाबली माहितेय का?

गडगंज श्रीमंती असलेल्या बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या पुढे जाऊन तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाची निवडणूक जिंकून दाखवत क्रिकेट जगतातील मानाचा पदभार सांभाळला. क्रिकेटसोबतच कुस्ती, कबड्डीसारख्या देशी खेळांच्या संघटनांमध्ये, व्यवस्थापनामध्येही तुम्ही महत्वाच्या भूमिका बजावल्या. क्रिडा क्षेत्रातील तुमची ही कामगिरी आपल्या आवाक्यात अनेक मोठ्या गोष्टी असल्याचे साक्ष देणाऱ्याच आहेत. 
'हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है और जितनेवालों को सोचने के लिए मजबूर करनेवाले को असली 'पॉवर' कहते हैं!  आपल्या कर्तृत्वाने नेतृत्वाचा नवा मानबिंदू सेट करणाऱ्या साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपली खेळी अशीच घोंगावत राहो...