पवारांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'तीन-चार महिने भूमिगत राहणारा...'

पवारांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'तीन-चार महिने भूमिगत राहणारा...'

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काल राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणामध्ये विविध मुद्यांवरुन महाविकास आघाडीवर टीका केली होती. शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलंय की, राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचा इतिहास नीट तपासावा. सर्व जातीच्या लोकांना घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे, असं त्यांनी म्हटलंय. तसेच शरद पवार यांनी भाजपवरी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, ते मोदींच्या संदर्भात काय काय भूमिका मांडत होते, ते महाराष्ट्राने पाहिलाय, आता त्यांची बदललेली भूमिका महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे आपण पाहिलंय. राज ठाकरे तीन-चार महिने भूमिगत होतात आणि मग मध्येच येऊन एखादं लेक्चर देतात.

पवारांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'तीन-चार महिने भूमिगत राहणारा...'
श्रीलंकेत संपूर्ण सोशल मीडियाही केला बंद; 36 तासांचा कर्फ्यू लागू

पुढे ते म्हणाले की, मुंबई महापालिकेमध्ये त्यांचा पक्ष किती प्रभावी आहे, हे मला माहिती नाही. त्यांचा आकडा मोजायचा असेल तर हाताच्या बोटांच्या पलिकडे जात नाही. यापलिकेडे ते काय कर्तृत्व गाजवतील, याबद्दल मी काही सांगू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पुढे शरद पवार यांनी म्हटलंय की, मुख्य जे प्रश्न आहेत तो प्रश्न महागाईचा आहे. पेट्रोल-डिझिलेच्या किंमतींचा आहे. याआधी किंमती वाढल्या नाहीत, असं नाही. पण रोज किंमती वाढण्याचा प्रकार आत्ताच घडतो आहे. याआधी असं घडत नव्हतं. त्याचा परिणाम सगळ्यावरच होतो आणि सगळ्याच्याच किंमती वाढतात. महागाईचा यक्षप्रश्न असताना हे सरकार त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीये. सामाजिक ऐक्य संकटात येईल, अशी वक्तव्ये आणि अशा भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या आहेत. देश पुढे न्यायचा असेल तर जाती-धर्मामध्ये विकोप नको तर एकवाक्यता हवी. मात्र, हे सरकार वेगळं वातावरण जाणीपूर्वक तयार करत आहे.

पवारांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'तीन-चार महिने भूमिगत राहणारा...'
वाढता वाढता वाढे! पेट्रोल-डिझेलच्या दरांनी आजही कापला खिसा

काश्मीर फाईल्स म्हणजे प्रोपगंडा

शरद पवार यांनी पुन्हा एकदा या चित्रपटावरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन आपलं मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, काश्मीर फाईल्स जेंव्हा घडलं तेंव्हाच्या सरकारला भाजपचाच पाठिंबा होता. ज्याच्याबद्दल फिल्म काढली ती कुणीही पाहिली तर कुणालाही अन्य धर्मीयांबद्दल संताप येईल आणि लोक कायदा हातात घेतील, अशी रचना केली आहे. ही घटना घडली तेंव्हा राज्यकर्ते कोण होते? ही कधीची घटना होती? विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान होते आणि भाजपचा पाठिंबा होते. त्यांच्या काळात मुफ्ती महंमद सिंग भाजपच्या पाठिंब्यांने मंत्री होते. अशी दिशाभूल करणारी फिल्म पहा, असं जर देशाचा प्रमुखच सांगत असेल, सत्ताधारी पक्ष लोकांना तिकीटे वाटत असेल तर हा सरळ सरळ सांप्रदायिक भेदाभेद निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असून त्यातून राजकीय फायदा मिळवला जात आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगलं नाहीये.

यूपीएचे प्रमुख होणार का?

यूपीएचं नेतृत्व तुम्ही कराल का या प्रश्नावर ते म्हणाले की, मला यात जराही रस नाही. मी त्यात पडणार नाही. पण एकत्र येणार असतील तर मी सहकार्य करणार, मदत जरुर करणार आहे. विरोधकांनी एकत्र यावं, अशीच भूमिका आहे. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये मजबूत आहे. मात्र, काँग्रेस पक्ष देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आहे. याचा विचार करुन काहीतरी निर्माण होण्याची शक्यता आहे.

ईडीच्या गैरवापरावर म्हणाले...

पुढे ते म्हणाले की, आम्ही सगळे लोक सत्तेचा गैरवापर करावा, या संस्कारातून वाढलो नाहीयोत. आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर या केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी कुणीही केला नव्हता. साधारण दहा वर्षांपूर्वी ईडी हा शब्दही कुणी ऐकला नव्हता. मात्र, आज ईडीशिवाय दुसंर काहीच ऐकायला मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com