esakal | Sharad Pawar |'इथेनॉल निर्मिती क्षेत्रात पदार्पणाची गरज', पवार-गडकरी एकाच मंचावर
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

'इथेनॉल निर्मिती क्षेत्रात पदार्पणाची गरज', पवार-गडकरी एकाच मंचावर

sakal_logo
By
ओमकार वाबळे

शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अहमदनगरमध्ये एकाच मंचावर आले. साखर कारखाने आणि सहकार क्षेत्राबद्दल बोलताना पवार यांनी इथेनॉलची गरज मांडली. इथेनॉल बनवण्याच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

यासाठी सरकारचे आर्थिक धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. इथेनॉलसोबतच हायड्रोजनपासून ऊर्जानिर्मिती करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग वाढलेला असला तरीही, साखरेला मर्यादा आहेत. मात्र इथेनॉलला नाहीत, असं पवार म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात इथेनॉलच्या क्षेत्रात काम करावं लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

गडकरींच्या कारकीर्दीत रस्ते दुपटीनं वाढले, असं म्हणत पवार यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले.

loading image
go to top