रामदास आठवलेंचे कोणीही ऐकत नाही; शरद पवारांनी आठवलेंना सुनावले

भारत नागणे
Tuesday, 29 September 2020

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील एनडीए सहभागी होऊन महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देवून सरकार स्थापन करावे, असे विधान केले होते. त्यावर आज शरद पवार यांनी त्यांच्या विधानाला फारसे महत्व न देता उलट त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली. 

पंढरपूर (सोलापूर) : रामदास आठवले यांचा राज्यात साधा एकही आमदार नाही की खासदार देखील नाही. त्यांचं सभागृहात ही कोणी ऐकत नाही आणि बाहेर देखील, अशा शब्दात शरद पवार यांनी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना फटकारले. 
मंत्री आठवले यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला एनडीएत सहभागी होण्याचे जाहीर आमंत्रण दिले होते. त्यावर बोलताना शरद पवार यांनी त्यांनी दिलेल्या आमंत्रणाची खिल्ली उडवत टोला लगावला. शरद पवार आज पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी रामदास आठवलेंनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण फेटाळून लावले. 
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील एनडीए सहभागी होऊन महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देवून सरकार स्थापन करावे, असे विधान केले होते. त्यावर आज शरद पवार यांनी त्यांच्या विधानाला फारसे महत्व न देता उलट त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली. 
खासदार पवार म्हणाले, रामदास आठवले यांच्या मताला फारशी किंमत उरली नाही. ते काहीही बोलत असतात. सभागृहात कोणीही त्यांचे ऐकत नाही. शिवाय बाहेर देखील कोणी त्यांचे मत गांभीर्याने घेत नाही. ते नेहमी असेच मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांच्या या विधानाला मी फार महत्व देत नाही असे सांगत एनडीत आपण सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. 

संपादन : वैभव गाढवे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar told No one listens to Ramdas Athavale