एनडी पाटील यांचे 'रयत'साठीचे योगदान कधीच पुसलं न जाणारं - शरद पवार

संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही - शरद पवार
sharad pawar
sharad pawarsakal media

कोल्हापूर - ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील (N. D. Patil) (वय ९३) यांचे आज निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे अकरा जानेवारीपासून येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मिडीयाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे.

यात ते म्हणतात, डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले.

sharad pawar
मोठी बातमी! नितेश राणेंचा अटकपूर्व ​जामीन फेटाळला

शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही. सर्व कुटुंबियांप्रति या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करतो. प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

दरम्यान, कालपासून एन. डी. पाटील यांची प्रकृती गंभीर बनली. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉ.अशोक भूपाळी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी वयाच्या ब्यानव्या वर्षाही त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. दरम्यान, त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला, अशा भावना सर्वच स्तरातून उमटत आहेत.

sharad pawar
ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांचे निधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com