जनता निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही; पवारांचा थेट मोदींना इशारा

लोकशाहीमध्ये तुम्ही आणि मी यापेक्षा सामान्य लोक अधिक हुशार असतात.
Sharad-Pawar-PM-Modi
Sharad-Pawar-PM-Modi
Updated on

मुंबई : लोकशाहीमध्ये तुम्ही आणि मी यापेक्षा सामान्य लोक अधिक हुशार असतात. आपल्याकडे बघणारे हजारो लोक असतात. ते लोक बोलत नाहीत. पण मतदानाची संधी मिळाल्यावर ते निर्णय घेतात. १९७७ साली ज्यांना राज्य मिळालं, त्यांना ते चालवता आलं नाही. मग पुन्हा लोकांनी इंदिरा गांधींच्या हातात सत्ता दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली, त्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत केंद्रातील मोदी सरकारला नाव न घेतला इशारा दिला आहे.

केंद्रीत सत्ता भ्रष्ट व्हायला लागते. हजारो लोकांनी याविरोधात भाषणे केली आणि लोकांनी ती सत्ता उखडून टाकली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा अनेक ठिकाणी पराभव झाला. जनता पक्षाचे सरकार आले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता, मात्र असे घडले. याचा अर्थ लोक बघत असतात, निरीक्षण करतात आणि राजकारण्यांनाही जनता योग्य रस्त्यावर आणते असे पवारांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आज केंद्रीय सत्ता जरी ठिकठिकाणचे राज्य बरखास्त करण्याचे काम करत असली तरी आज ना उद्या सामान्य जनता याचा निकाल घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांची तयारी असली पाहीजे असे पवारांनी ट्वीटमध्ये नमुद केले आहे. राज्यात पाऊस चांगला सुरु आहे. पर्जन्यकाळ संपल्यावर आपल्याला जोमाने काम करायचे आहे. पुढचे अडीच वर्ष जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून, संघटना बळकट करणे, लोकांच्या अडचणी समजून घेणे यासारखी कामं करायची असल्याचेही पवारांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

सुदैवाने आपल्याकडे विरोधी पक्षनेतेपद असल्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ आपल्याकडे आहे. तरीही लोकांवर अन्याय होत राहिला तर लोकशाहीच्या चौकटीत रस्त्यावर उतरायचा देखील निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. अनेकजण मला बोलले की, ४० मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगले काम केल्याचे ठिकठिकाणी ऐकायला मिळते. प्रदेशाध्यक्षांनी देखील सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना व जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे, असे आवाहन पवारांनी ट्वीटमध्ये केले आहे.

महाराष्ट्रात महसूल खात्याचे सहा विभाग आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून या विभागांप्रमाणे संघटनेची जबाबदारी काही लोकांकडे द्यावी. ज्यांच्यावर जबाबदारी असेल त्यांनी आपल्या विभागावर संपूर्ण लक्ष ठेवून काम करावे असेही पवारांनी म्हटले आहे. याचपद्धतीने महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक न्याय आणि ओबीसी विभागाने देखील काम करावे. मुंबईतही प्रभावीपणे काम करावे. हे सर्व उत्तमरीत्या झाले तर चित्र नक्कीच बदलेल. राज्यात एवढी मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com