Ajit Pawar : ''हल्ली सर्वांनाच वारीत चालावे वाटते, मग मीही...'', शरद पवारांचं नाव न घेता अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Winter Session 2024 : ''मुंबई गोवा महामार्गावर ‌आता एखादं पुस्तक काढावं लागेल, पिक्चर काढावा लागेल.. जसा मुंबई ते गोवा असा पिक्चर निघाला आहे तसं. या महामार्गावर अनेक खासदार झाले, आमदार झाले पण तो रास्ता काही झाला नाही.''
Ajit Pawar sharad pawar
Ajit Pawar sharad pawaresakal

Pandharpur Wari : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विधानसभेत अजित पवारांनी उत्तर दिलं. याशिवाय त्यांनी वारीमध्ये चालणार असल्याचंही म्हटलंय. शरद पवारांचं नाव न घेता त्यांनी मिश्किल टिपण्णी केली.

शरद पवार आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा 7 जुलैला बारामती ते सणसर हे अंतर पार करणार आहे. त्या दिवशी शरद पवार वारीत सहभागी होतील. पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यावर्षी शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत.

Ajit Pawar sharad pawar
नवीन मराठा-कुणबी राहणार 'महावितरण' भरतीपासून वंचित! 'ओबीसी'त समावेशाचा विकल्प नसल्याने धास्ती

तोच धागा धरुन अजित पवार सभागृहात म्हणाले की, हल्ली सर्वांना वारीत चालावे वाटते. त्यामुळे मी देखील पालखीत चालणार आहे. जयंतराव येतील असे मला वाटत नाही ते आले तर मी त्यांना कुठेही घेऊन जायला तयार आहे.

''मी पण परवा वारीला जाणार आहे.. बारामती ते काटेवाटी चालणार आहे. आता बरेच लोक वारीत‌ चालायला लागलेत.'' असं म्हणत अजित पवारांनी आपणही वारीत चालणार असल्याचं म्हटलंय.

Ajit Pawar sharad pawar
Prakash Ambedkar: वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर प्रकाश आंबेडकरांनी बोलणं टाळलं! म्हणाले, 'आयाराम गयारामचं जे राजकारण...'

उद्योगांबाबत श्वेतपत्रिका काढणार- अजित पवार

  • अजित पवार म्हणाले की, उद्योग गुजरातला पळवले, असं विरोधक सांगतात. त्याची श्वेतपत्रिका काढली जाईल.. पण फेक नरेटिव्ह पसरवू नका.

  • ''मुंबई गोवा महामार्गावर ‌आता एखादं पुस्तक काढावं लागेल, पिक्चर काढावा लागेल.. जसा मुंबई ते गोवा असा पिक्चर निघाला आहे तसं. या महामार्गावर अनेक खासदार झाले, आमदार झाले पण तो रास्ता काही झाला नाही.''

  • काहींनी खड्डे मोजले, काहींनी फोटो काढले.. आता नितीन गडकरी यांनी सांगितलंय हा रस्ता पूर्ण करु म्हणून. जसा बॉम्बे टू गोवा सिनेमा निघाला तसा आता 'मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग उशीर का झाला?' असा सिनेमा काढावा लागेल, असंही अजित पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com