
Sharad Pawar : मी असल्या भानगडीत पडत नाही; ठाकरे-आंबेडकर युतीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया
मुंबईः उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. उद्या याबाबत अधिकृत घोषणा होईल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ही युती मान्य नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
आज प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेतलं पाहिजे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्या याबाबत अधिकृत होणार आहे.
शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी, मला याबाबत माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे या युतीबाबत पवारांची समहती नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उद्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त या युतीची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जातंय. तर उद्याच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाळ संपत आहे. शिवसेना पक्षाचा वाद निवडणूक आयोगात सुरु असल्याने नवीन पक्षप्रमुख निवड होते की नाही? याबाबत स्पष्टता नाही.