Sharad Pawar: ''इथल्याच कंपन्यांना दावोसमध्ये नेऊन करार केले'', शरद पवारांचा गौप्यस्फोट

Uday Samant: उद्योगमंत्री उदय सामंत सत्तेतून बाहेर पडणार असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा संदर्भ घेऊन राजकीय भूंकप होईल, असे वाटते काय या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘मी तीच वाट पाहतोय. उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोसमध्ये बसून बोलताना पाहिले.
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

कोल्हापूरः ‘‘दावोसमधून महाराष्ट्रात उद्योग आणल्याचा देखावा करण्यात आला आहे. काल जे करार झाले त्यापैकी अनेक कंपन्यांचे करार तीन वर्षांपूर्वी झाले होते. जिंदाल कंपनी ही महाराष्ट्रातील आहे. मात्र त्यांच्याशी करार दावोसमध्ये केला. त्यामुळे इथल्याच कंपन्यांना दावोसमध्ये नेऊन करार केल्याचे दिसते. यातून दावोसमधून त्यांना महाराष्ट्रात आणल्याचा देखावा करण्यात आल्याची टीका खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com